Oswal seeds share price. Esakal
Personal Finance

Oswal Seeds Share: 5 वर्षात 750% परतावा, गुंतवणुकदारांचे पैसे साडेआठ पटीने वाढले, 'या' शेअरचा बाजारात धमाका

Oswal Seeds Share Price: प्रमोटर्सकडे कंपनीत 69.66 टक्के हिस्सा आहे. या व्यतिरिक्त लोकांचे 30.34 शेअर्स आहेत. श्रीओस्वाल सीड्स अँड केमिकल्स ही बियाणे आणि कृषी उत्पादने उद्योगातील एक कंपनी आहे.

आशुतोष मसगौंडे

श्री ओसवाल सीड्स अँड केमिकल्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये चांगला परतावा दिला आहे. कंपनीने नुकतेच आपले तिमाही निकालही जाहीर केले आहेत. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 2.16 टक्क्यांची वाढ दिसून आली. एनएसईवर हा शेअर सध्या 35.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 324.72 कोटी आहे. त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक 61.17 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 23.25 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 5052.61 लाखांचे उत्पन्न नोंदवले. जून तिमाहीत त्याचा करानंतरचा नफा (PAT) वार्षिक आधारावर सकारात्मक होता, जो 146.16 लाखांच्या (Q1FY24) तोट्यावरून 229.67 लाखाच्या (Q1FY25) नफ्यात वाढला आहे. कंपनी सतत आपले कर्ज कमी करत आहे आणि तिचे कर्ज ते इक्विटी गुणोत्तर 0.32 टक्के आहे.

प्रमोटर्सकडे कंपनीत 69.66 टक्के हिस्सा आहे. या व्यतिरिक्त लोकांचे 30.34 शेअर्स आहेत. श्रीओस्वाल सीड्स अँड केमिकल्स ही बियाणे आणि कृषी उत्पादने उद्योगातील एक कंपनी आहे, जी वेळेवर वितरणासह उच्च दर्जाची उत्पादने देण्यासाठी ओळखली जाते.

ऑगस्ट 2019 मध्ये, श्रीओस्वाल सीड्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत फक्त 4.18 रुपये होती, जी आज 35.50 रुपये झाली आहे. म्हणजे 5 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 750 टक्के मजबूत परतावा दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात अंदाजे साडेआठ पट वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT