IIT Placement Crisis Sakal
Personal Finance

IIT Placement: धक्कादायक! 8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार; अनेकांना 6 लाखांपेक्षा कमी ऑफर

IIT Placement Crisis: नोकरी मिळवण्यात अयशस्वी झालेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, तर आयआयटीचे विद्यार्थी 3.6 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतचे अत्यंत कमी पॅकेज स्वीकारत आहेत. आयआयटीसाठी हे पॅकेज खूपच कमी आहे.

राहुल शेळके

IIT Placement Crisis: गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. TCS, Infosys सारख्या बड्या कंपन्यांमध्ये नोकरीचा वेग मंदावला आहे. आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांनाही याचा फटका बसू लागला आहे.

सामान्य लोकांचा असा विश्वास आहे की आयआयटीमध्ये शिक्षण घेतल्याने केवळ नोकरीची हमी मिळत नाही तर मोठ्या पॅकेजसह उत्तम नोकरीची हमी देखील मिळते. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांपैकी फक्त काही हजार विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक IIT परीक्षेला बसतात, पण देशातील 23 IIT मध्ये फक्त 10 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

आयआयटीचे अनेक विद्यार्थी बेरोजगार

CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, आता IIT मधून पदवी घेतलेल्या लोकांनाही नोकरी शोधण्यात अडचणी येत आहेत. 2023-24 च्या प्लेसमेंटमध्ये हजारो आयआयटीयनांना अजूनही नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत, असे या अहवालात एका आरटीआयचा हवाला देण्यात आला आहे. अशा आयआयटीयन विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे 8 हजार आहे.

2023-24 मध्ये प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या एकूण आयआयटीयनांपैकी 38 टक्के हा आकडा किती चिंतेचा आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो. 2023 मध्ये प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या न मिळालेल्या आयआयटीयनांची संख्या जवळपास दुप्पट आहे.

नोकरी मिळवण्यात अयशस्वी झालेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, तर आयआयटीचे विद्यार्थी 3.6 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतचे अत्यंत कमी पॅकेज स्वीकारत आहेत. आयआयटीसाठी हे पॅकेज खूपच कमी आहे.

आयआयटीमधून शिकणाऱ्या लोकांना करोडोंचे पॅकेज मिळत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. अहवालानुसार, या वर्षी आयआयटीयनांना दिले जाणारे सरासरी सीटीसी प्रति वर्ष 17 लाख रुपयांवर आले आहे.

अहवालात, आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेले आणि प्लेसमेंट मेंटॉर म्हणून काम करणारे धीरज सिंह यांचा हवाला देऊन ही आकडेवारी देण्यात आली आहे, ज्यांनी अनेक आरटीआयद्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे.

त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली सर्व 23 आयआयटींकडून उत्तरे मागवली होती. आयआयटीकडून मिळालेले प्रतिसाद, त्यांचे वार्षिक अहवाल, मीडिया रिपोर्ट्स आणि विद्यार्थी आणि प्लेसमेंट सेल यांच्याशी झालेल्या संभाषणांच्या आधारे त्यांनी हा डेटा तयार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT