Oxfam report World's richest five double their wealth as poorest get poorer  Sakal
Personal Finance

Oxfam Report: धक्कादायक अहवाल! 2020 पासून श्रीमंतांची संपत्ती झाली दुप्पट; 5 अब्ज लोक झाले गरीब

Oxfam Report: जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत ऑक्सफॅमचा अहवाल सादर करण्यात आला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

राहुल शेळके

Oxfam Report In World Economic Forum : जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत ऑक्सफॅमचा अहवाल सादर करण्यात आला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगातील पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असताना, 5 अब्ज लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहेत ज्यांची सध्याची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 182.4 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत.

अॅमेझॉनचे जेफ बेझोस 176.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 135.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आणि मार्क झुकरबर्ग 132.3 अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहे.

गेल्या चार वर्षात जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दर तासाला 14 दशलक्ष डॉलर्स कमावले. जर आपण ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे 116 कोटी रुपये होते. याचा अर्थ जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या 4 वर्षात दर तासाला 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

148 कंपन्यांनी 1.8 ट्रिलियन डॉलर्सचा नफा कमावला

अंदाजे कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख 148 कंपन्यांनी 1.8 ट्रिलियन डॉलरचा नफा कमावला आहे, जो 3 वर्षांच्या सरासरीपेक्षा 52 टक्के अधिक आहे. जगातील 1,600 मोठ्या कंपन्यांपैकी केवळ 0.4 टक्के खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी कामगारांना त्यांच्या कामानुसार वेतन आणि इतर सुविधा दिल्या आहेत.

800 दशलक्ष कामगारांच्या पगारात घट

पगार कपातीमुळे कामगारांसमोर अन्न व उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. जगभरात सुमारे 800 दशलक्ष कामगारांच्या वेतनात घट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे 25 दिवसांचे वार्षिक उत्पन्न कमी होत आहे.

या अहवालानुसार टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन आणि गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्यासह अनेक श्रीमंत लोकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

आर्थिक विषमता का वाढली?

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, आर्थिक विषमतेच्या दृष्टीने गेली काही वर्षे अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या चार वर्षात कोरोना महामारी, युद्ध आणि महागाई या कारणांमुळे कोट्यवधी लोक गरीब झाले आहेत.

2020 नंतर, आतापर्यंत जगभरात सुमारे 5 अब्ज लोक गरीब झाले आहेत. दुसरीकडे काही निवडक लोकांची संपत्ती मात्र वेगाने वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT