mutual fund
mutual fund sakal
Personal Finance

म्युच्युअल फंडातील बोधकथा

डॉ. वीरेंद्र ताटके

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, गुंतवणूक करण्याची वेळ, विक्री करण्याची वेळ, गुंतवणुकीचा कालावधी, त्यांनी अवलंबलेले पर्याय या गोष्टींतून नव्या गुंतवणूकदारांना अनेक मुद्द्यांचा बोध होतो. जुन्या गुंतवणूकदारांसाठीदेखील हा बोध खूप उपयोगाचा आहे. अशा पाच बोधकथा आपण आज पाहणार आहोत. या बोधकथांसाठी ‘एचडीएफसी टॉप १००’ या फंडाची गेल्या पंधरा वर्षांतील माहिती उदाहरणादाखल घेतली आहे.

स्थिर राहण्याचा फायदा

रमेशने या फंडात जानेवारी २००८ मध्ये एकरकमी १० लाख रुपये गुंतवले होते. त्यावेळी त्या फंडाची ‘एनएव्ही’ १६० रुपयांच्या आसपास होती. त्यानंतर बाजारात बरेच चढ-उतार येऊन गेले. परंतु, रमेशने त्याची गुंतवणूक काढून घेतली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्या फंडाची ‘एनएव्ही’ एक हजार रुपयांच्या पुढे गेली आणि आता त्याच्या दहा लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य ६२ लाख रुपयांच्या पुढे आहे.

बोध : बाजारात कितीही चढ-उतार आले, तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास चांगल्या म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणुकीवर दीर्घकाळात उत्तम परतावा मिळतो.

‘धीरापोटी फळे रसाळ गोमटी’

सुरेशने जानेवारी २०१० मध्ये त्याच फंडात दोन वर्षे मुदतीची ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली, त्यावेळी फंडाची ‘एनएव्ही’ साधारण १८० रुपये होती. थोड्याच कालावधीत ती २२५ रुपयांपर्यंत पोचली आणि जेव्हा सुरेशच्या गुंतवणुकीची मुदत संपली तेव्हा ‘एनएव्ही’ पुन्हा १८० रुपयांच्या आसपास आली. निराश होऊन त्याने गुंतवणूक विकून टाकली. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्या फंडाची ‘एनएव्ही’ एक हजार रुपयांच्या पुढे गेली. मात्र, सुरेशने त्याची गुंतवणूक आधीच विकून टाकली होती.

बोध : अल्पकाळात ‘एसआयपी’ फारसा फायदा मिळवून देत नाही. काही वेळेस अल्पकाळात तोटादेखील सहन करावा लागतो. अशावेळी अधीर होऊन गुंतवणूक विकल्यास भविष्यातील संभाव्य फायद्यास आपण मुकतो.

तेजीच्या मोहाचा बळी

महेशने जून २०१९ मध्ये या फंडात १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, त्यावेळी या फंडाची ‘एनएव्ही’ साधारण ५०० रुपये होती. मात्र, मार्च २०२० मध्ये या फंडाची ‘एनएव्ही’ ३५० रुपयांपर्यंत गडगडली हे पाहून घाबरून जाऊन, त्याने त्याची गुंतवणूक तीन लाख रुपयांचा तोटा सहन करून सात लाख रुपयांना विकली.

बोध : बाजार तेजीत असताना एकरकमी गुंतवणूक करून अल्पावधीत फायदा मिळविण्याचे स्वप्न पाहिले, तर आपला भ्रमनिरास होतो.

अचूक वेळ साधण्याचा लाभ

गणेशने मार्च २०२० मध्ये बाजार कोसळला तेव्हा या फंडात एकरकमी १० लाख रुपये गुंतवले. तेव्हा या फंडाची ‘एनएव्ही’ साधारण ३५० रुपये होती. अवघ्या चार वर्षांत त्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य तिप्पट वाढून तीस लाख रुपयांच्या आसपास गेले आहे.

बोध : काही कारणाने बाजार एकदम कोसळला, तर त्यावेळी मोठी गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा भविष्यात मिळू शकतो.

दीर्घ ‘एसआयपी’मुळे चांदी

उमेशने फेब्रुवारी २०१४ ते फेब्रुवारी २०२४ अशी दहा वर्षांची ‘एसआयपी’ केली. या दहा वर्षात त्याने दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १२ लाख रुपये गुंतवले, ज्याचे आजचे बाजारमूल्य तब्बल २७ लाख रुपये आहे.

बोध : चांगल्या फंडातील दीर्घकाळातील ‘एसआयपी’ उत्तम परतावा देते.

वरील बोधकथांमध्ये ‘एचडीएफसी टॉप १००’ हा फंड केवळ उदाहरणादाखल घेतला आहे. इतर म्युच्युअल फंडातदेखील अशाच बोधकथा पाहायला मिळतील. या बोधकथांतून योग्य तो बोध घेऊन गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे नियोजन करावे.

(डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत आणि यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT