Paytm Bank fiasco list of mutual funds with stakes in Vijay Shekhar Sharma's Paytm company  Sakal
Personal Finance

Paytm: SIP मध्ये गुंतवणूक करत आहात? जाणून घ्या पेटीएममध्ये कोणत्या मोठ्या फंडांनी पैसे गुंतवले आहेत

Investing in SIP? Know which big funds have invested in Paytm: ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएमच्या अडचणी वाढत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किटवर आले आहेत.

राहुल शेळके

Paytm: ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएमच्या अडचणी वाढत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किटवर आले आहेत. लोअर सर्किट म्हणजे बाजारात कंपनीचे शेअर्स कोणीही खरेदी करत नाहीत.

अनेक मोठ्या फंडांनी त्यांचे पैसे पेटीएममध्ये गुंतवले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की कोणत्या मोठ्या फंडांनी पेटीएममध्ये पैसे गुंतवले आहेत. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications मध्ये म्युच्युअल फंडांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 1995 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पेटीएममध्ये एकूण 68 म्युच्युअल फंडांचे 1995 कोटी रुपये आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान, म्युच्युअल फंडांनी या कंपनीतील त्यांची होल्डिंग एकूण 77% ने वाढवली आहे.

'या' फंडांनी सर्वाधिक पैसे गुंतवले आहेत

पेटीएमच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण

आज शेअर बाजारात तेजी आहे आणि सकाळी 10:55 वाजता, बीएसई सेन्सेक्स 53 अंकांनी वधारून 72,172 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 54 अंकांनी वर होता.

सोमवारी, भारतातील आघाडीच्या फिनटेक पेटीएमच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा 10 टक्के घसरण झाली आणि तो 48.70 रुपयांनी घसरून 438.50 रुपयांच्या पातळीवर आहे.

पेटीएमचे शेअर्स गेल्या 5 दिवसात 42.35 टक्क्यांनी घसरले आहेत. तीन ट्रेडिंग दिवसांमध्ये पेटीएम शेअर्समध्ये 42.3 टक्के घसरले त्यामुळे गुंतवणूकदारांचे 20,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT