Paytm Layoffs Sakal
Personal Finance

Paytm Layoffs: पेटीएम कंपनी घेणार मोठा निर्णय! 5,000 ते 6,300 कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत; AI आहे कारण?

Paytm Layoffs: पेटीएमची सहकारी कंपनी One 97 Communications Ltd कंपनी पुन्हा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. याचे कारण AI मानले जात आहे.

राहुल शेळके

Paytm Layoffs: पेटीएमची सहकारी कंपनी One 97 Communications Ltd कंपनी पुन्हा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. याचे कारण AI मानले जात आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, एआय आधारित तंत्रज्ञानाच्या आधारे किमतीच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

पेटीएमने सांगितले की कंपनी आपल्या कामासाठी AI चा प्रयोग करत आहे. कंपनी खर्च कमी करण्यासाठी नवीन पर्याय देखील तयार करू शकते. यामुळे कंपनीच्या महसुलातही वाढ होईल. त्याचे परिणाम येत्या तिमाहीत दिसून येतील. त्याचे फायदेही बाजारात दिसून येतील.

कंपनी 15-20 टक्के कर्मचारी कपात करु शकते

फायनान्शियल एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 15-20 टक्के कर्मचारी कमी करू शकते. याचा अर्थ असा की 5,000-6,300 कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. कारण One97 Communications चे 400-500 कोटी वाचवण्याचे उद्दिष्ट आहे.

अलीकडेच पेटीएमच्या आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कारवाईचा परिणाम दिसून येत आहे. पेटीएमच्या चौथ्या तिमाहीत पेटीएमची कंपनी One97 कम्युनिकेशन्सला 550 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत पेटीएमचे उत्पन्न 2.8% नी घसरले आहे.

कंपनीच्या आर्थिक अनियमिततेबाबत आरबीआयने प्रश्न उपस्थित केले होते. पेटीएमवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले. पेटीएम फास्टॅग सारख्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या ग्राहकांवर दिसून येत होता. कंपनीत नवीन ग्राहक येत नाहीत. तर जुने ग्राहकही सोडून जाऊ लागले.

व्यापाऱ्यांसह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन RBI ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 15 मार्चपासून कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप शिल्लक ठेवण्यास मनाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT