Paytm Payments Bank  Sakal
Personal Finance

Paytm Payments Bank : ‘पेटीएम पेमेंट्स बँके’तून सुरिंदर चावला बाहेर; काय आहे कारण?

पेटीएम पेमेंट्स बँकेसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, नुकताच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, नुकताच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीपासून नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि नवीन कर्जव्यवहारांवर निर्बंध घातले असून, नव्याने ग्राहकनोंदणी करण्यासही बंदी घातली आहे. सुरिंदर चावला २६ जून २०२४ रोजी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदाच्या कार्यभारातून मुक्त होतील.

वैयक्तिक कारणांमुळे आणि नोकरीच्या अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जानेवारी २०२३ मध्ये ते पेटीएम पेमेंट्स बँकेत रुजू झाले होते. ‘पेटीएम’चे प्रवर्तक विजय शेखर शर्मा यांनीदेखील गेल्या महिन्यात या बँकेचे अर्धवेळ बिगर कार्यकारी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT