Paytm Shares Today eSakal
Personal Finance

Paytm Shares : आरबीआयच्या कारवाईचा पेटीएमला फटका! धडाम् करुन कोसळले शेअर्स.. किती झालं नुकसान?

भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारच्या या कारवाईनंतर गुरुवारी शेअर बाजारात पेटीएमला मोठा फटका बसला आहे.

Sudesh

Paytm Shares Today : भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारच्या या कारवाईनंतर गुरुवारी शेअर बाजारात पेटीएमला मोठा फटका बसला आहे. आज व्यवहार सुरू झाल्यानंतर पेटीएमची पॅरंट कंपनी असणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं. यानंतर या शेअर्सची किंमत 609 रुपये झाली आहे.

आरबीआयने बुधवारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयने दिलेल्या निर्देशांनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये नवीन ग्राहक जोडणे, नवीन क्रेडिट देणे या गोष्टींवर तातडीने निर्बंध लावले आहेत. तसंच पेटीएम वॉलेट, फास्टॅग अशा सेवांमध्ये 29 फेब्रुवारी नंतर पैसे टाकता येणार नाहीत, असंही RBI ने स्पष्ट केलं आहे.

पेटीएमचं स्पष्टीकरण

दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास स्पष्टीकरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या निर्देशांमुळे ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. सध्या डिपॉझिट असलेल्या रकमेवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. ते पैसे ग्राहक वापरू शकतील असं पेटीएमने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT