Penalty on M Damodaran Sakal
Personal Finance

SEBI: न्यायालयाने माजी SEBI प्रमुखांना ठोठावला 206 कोटी रुपयांचा दंड; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Penalty on M Damodaran: आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन आणि इतरांविरोधात मोठा निर्णय दिला आहे. 11 कोटी डॉलरच्या नुकसानभरपाईचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामध्ये एम दामोदरन यांचा हिस्सा सुमारे 206 कोटी रुपये असेल.

राहुल शेळके

Penalty on M Damodaran: आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन आणि इतरांविरोधात मोठा निर्णय दिला आहे. 11 कोटी डॉलरच्या नुकसानभरपाईचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामध्ये एम दामोदरन यांचा हिस्सा सुमारे 206 कोटी रुपये असेल. आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने एकूण 916 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

यूएस कंपनी अपहेल्थ आणि ग्लोकल हेल्थकेअर सिस्टीम्सचा समावेश असलेल्या वादात आंतरराष्ट्रीय लवादाने दंड ठोठावला आहे. न्यायालयाने दामोदरन यांना कराराचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. दामोदरन हे ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्समध्ये शेअरहोल्डर होते. (Former SEBI Chief M Damodaran asked to pay more than 200 crores by an arbitration Court)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

UpHealth ची तक्रार होती की त्यांनी Glocal Healthcare मधील 94.81 टक्के स्टेक खरेदी करण्यासाठी 2100 कोटी रुपये दिले होते. करार पूर्ण झाला आणि ठरलेली रक्कम दिली गेली.

तरीही कंपनीच्या प्रवर्तकांनी व्यवस्थापन हस्तांतरित केले नाही आणि त्यांचे अधिकार राखून ठेवले. ग्लोकल हेल्थकेअरची आर्थिक विवरणे देखील अपहेल्थला दिली गेली नाहीत. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली.

हे प्रकरण न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज NYSE लिस्ट UpHealth Inc शी संबंधित आहे. Uphealth Inc. ने लवादाच्या निर्णयाची माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. ग्लोकल हेल्थकेअर सिस्टिमच्या खरेदीच्या बाबतीत हा आदेश देण्यात आला आहे. हे प्रकरण कराराच्या उल्लंघनाशी संबंधित आहे.

एम दामोदरन हे ग्लोकल हेल्थकेअर सिस्टीमचे भागधारक होते. करारानंतरही त्यांनी ग्लोकल हेल्थकेअरचे नियंत्रण सोडले नाही, त्यामुळे हा आदेश देण्यात आल्याचे लवादाने म्हटले आहे. याशिवाय सय्यद सबाहत अजीम आणि रिचा सना अजीम यांना 315-315 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गौतम चौधरीला सुमारे 43 कोटी रुपये आणि किम्बरलाइटला सुमारे 37 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दामोदरन यांचा अनेक भारतीय कंपन्यांच्या बोर्डांमध्ये समावेश आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अपयशानंतर, वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बोर्डाने दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

ब्लूमबर्गच्या मते, ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता येथे हॉस्पिटल म्हणून काम करते. Glocal Healthcare Systems भारतातील ग्राहकांना सेवा देते. याव्यतिरिक्त, UpHealth आरोग्य सेवा पुरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT