Financial Wisdom From Mahatma Gandhi Sakal
Personal Finance

Gandhi Jayanti 2023: बंदे मे था दम! मिलेनियल्सनी देखील शिकावं बापूंचं बजेट मॅनेजमेंट

Financial Wisdom From Mahatma Gandhi: आर्थिक व्यवस्थापनाबद्दलची गांधींची शिकवण आजही महत्त्वाची आहे.

राहुल शेळके

Financial Wisdom From Mahatma Gandhi: आज संपूर्ण जग महात्मा गांधींची जयंती साजरी करत आहे, ज्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गेल्या शतकातील महान मानवांमध्ये महात्मा गांधींची गणना होते. गांधीजींचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनुयायी मोठ्या संख्येने आहेत.

मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ते नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा यांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेतली आहे. देशातील आर्थिक प्रश्नांवर महात्मा गांधींनी आपले मत मांडले आहे. आर्थिक व्यवस्थापनाबद्दलची गांधींची शिकवण आजही महत्त्वाची आहे.

देशातील काही खासगी बँकांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये बँकांनी महात्मा गांधींची आजच्या काळातील प्रासंगिकता स्पष्ट केली आहे.

देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने गांधी जयंती 2023 निमित्त एक विशेष मोहीम तयार केली आहे. त्या मोहिमेत महात्मा गांधींच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल सांगितले आहे. मोहिमेत, ICICI बँकेने महात्मा गांधींच्या कोट्सची मदत घेतली आहे.

महात्मा गांधींचे आर्थिक विचार

1: महात्मा गांधी म्हणतात- जगात प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेशा गोष्टी आहेत, परंतु त्या लोभासाठी नाहीत. आर्थिक स्थिरतेसाठी इच्छांपेक्षा गरजांना प्राधान्य दिले पाहिजे.

2: गांधी म्हणतात- शक्ती शारीरिक क्षमतेने येत नाही, ती इच्छाशक्तीवर अवलंबून असते. आर्थिक शक्ती बँक बॅलन्समधून येत नाही, तर आर्थिक नियोजनातून येते.

3: गांधी म्हणतात- तुम्ही आज काय करता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आजच बचत आणि गुंतवणूक करा.

एचडीएफसी बँकेने, ब्लॉगमध्ये गांधींच्या आर्थिक शिकवणीबद्दल देखील सांगतले आहे. गांधींचे जीवन आपल्याला स्वयंशिस्त आणि संयम शिकवते. आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाला या दोन गुणांची सर्वाधिक गरज असते.

गांधीजी म्हणायचे की जीवनात शिस्त असेल तर सर्व काही साध्य करता येऊ शकते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणतेही आर्थिक ध्येय असल्यास ते साध्य करण्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT