Petrol, diesel may get cheaper as OMCs become profitable  Sakal
Personal Finance

Petrol Diesel Price: दिलासादायक बातमी! पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकरच कपात होण्याची शक्यता

Petrol Diesel Price: ग्राहकांसाठी दिलासा देण्यासाठी सरकार चर्चा करत आहे.

राहुल शेळके

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबात लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी क्रूडच्या किंमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

तेल विपणन कंपन्या (OMCs) आता दोन्ही इंधनांवर नफा कमावत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ शकतात, असे वृत्त ET NOWने दिले आहे. ग्राहकांसाठी दिलासा देण्यासाठी सरकारने यावर चर्चा सुरू केली आहे.

क्रूडच्या सध्याच्या किंमतींवर वित्त आणि तेल मंत्रालय चर्चा करत आहे. मंत्रालय जागतिक परिस्थिती सोबतचं OMCs च्या नफ्यावर देखील चर्चा करत आहेत.

OMC आता पेट्रोलवर 8-10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 3-4 रुपये नफा कमावत आहेत. गेल्या तिमाहीतील नफ्यामुळे OMCs चा एकूण तोटा आता कमी झाला आहे. आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन ओएमसींनी गेल्या तिमाहीत 28,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याने महागाई रोखण्यात सरकारला मदत होणार आहे. शिवाय केंद्र सरकारचा विश्वास आहे की क्रूडच्या किंमती प्रति बॅरल 75-80 डॉलरच्या श्रेणीत राहतील.

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून कायम आहेत. मागील वर्षी 21 मे रोजी इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेव्हा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केले होते.

आज चार शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.80 रुपये आणि डिझेल 94.40 रुपये प्रति लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT