PIB Fact Check rs 350 will be deducted from bank account for not voting in lok sabha elections  Sakal
Personal Finance

Fact Check: मतदान न केल्यास तुमच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार? काय आहे प्रकरण

PIB Fact Check: ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल शेळके

PIB Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या हवाल्याने दावा केला जात आहे की लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील. ही बातमी इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात निवडणूक आयोगाचा हवाला देत लोकसभा निवडणुकीत मतदान न करणे लोकांना महागात पडू शकते. ही बातमी वृत्तपत्राच्या क्लिपिंगच्या फोटोच्या रूपाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर अनेक लोक ही बातमी शेअर करत आहेत, ज्यामध्ये निवडणूक आयोगावर टीका होत आहे. निवडणूक आयोगाने न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याचे या बातमीत म्हटले आहे. या बातमीत असे म्हटले आहे की जे मतदान करणार नाहीत त्यांची ओळख आधार कार्डद्वारे केली जाईल आणि त्या कार्डशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील.

काय व्हायरल बातमी मागचे सत्य?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) त्यांच्या तपासणीमध्ये या व्हायरल बातमीचे सत्य सांगितले आहे. पीआयबीनुसार, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याच्या एक्स अकाउंटवर असेही म्हटले आहे की, “आमच्या लक्षात आले आहे की अशा प्रकारच्या खोट्या बातम्या काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.

निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही पीआयबीने म्हटले आहे. जबाबदार नागरिक व्हा, मतदान करा !! मात्र, मतदानासाठी कोणी कोणावर दबाव आणू शकत नाही किंवा ब्लॅकमेल करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT