PM kisan sanman nidhi yojana Sakal
Personal Finance

PM Kisan Samman Nidhi: शेतकर्‍यांना मोठी भेट, PM मोदींनी किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता केला जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील सीकर येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी हप्ता जारी केला आहे.

राहुल शेळके

PM Kisan Samman Nidhi 14th Installment:

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता, ज्याची शेतकरी वाट पाहत होते, तो आज जारी झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सीकर येथे एका सरकारी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत हा हप्ता जारी केला. 2000 रुपये थेट देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीकरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात अनेक विकासकामांची पायाभरणीही केली आहे. याशिवाय त्यांनी 1.25 लाख किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटनही केले आहे.

पीएम मोदी राजस्थान आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज राजस्थानचे कार्यक्रम संपवून ते गुजरातला रवाना होतील.

कार्यक्रमाला आरोग्य मंत्री आणि कृषिमंत्र्यांनीही संबोधित केले

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही केली. यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे

  • यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

  • होमपेजवर तुम्हाला Former Corner चा पर्याय दिसेल, इथे क्लिक करा

  • आता तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल

  • पुढील पानावर तुम्हाला राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

  • Get Report वर क्लिक करा

  • संपूर्ण तपशील आता तुमच्यासमोर उघडेल

अर्ज करूनही हप्ता न मिळण्याचे हे आहे कारण

  • जर तुम्ही अर्जात चुकीची माहिती दिली असेल.

  • पीएम किसान अंतर्गत कोणतेही आवश्यक कागदपत्र सादर केले नसल्यास.

  • तुम्ही शेतकरी आहात पण शेती तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर आहे, पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी आवश्यक आहे.

  • दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेऊन भाड्याने शेती केली तर.

  • शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असल्यास.

  • राज्य/केंद्र सरकार तसेच PSU आणि सरकारी स्वायत्त संस्थांचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी.

  • डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट, वकील असे व्यावसायिक आहेत.

  • 10,000 रुपये पेक्षा जास्त मासिक पेन्शन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT