PM Modi inaugurates Surat Diamond Bourse, the world’s biggest workspace  Sakal
Personal Finance

Surat Diamond Bourse: PM मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन

Surat Diamond Bourse: आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र आहे.

राहुल शेळके

Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे जगातील सर्वात मोठ्या ऑफिसचे उद्घाटन केले. हे कॉम्प्लेक्स सुरत डायमंड बोर्स म्हणून ओळखले जाईल. आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र आहे.

हे कॉम्प्लेक्स रफ आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.

सुरत डायमंड बोर्स (SDB) ही सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे आणि ही इमारत यूएस संरक्षण मुख्यालय पेंटागॉनपेक्षा मोठी आहे. त्याची 4500 हून अधिक कार्यालये आहेत. सुरत डायमंड बाजार 3,500 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू झाले. त्याचे काम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले.

सूरत डायमंड बाजार तयार करण्याची 4 प्रमुख कारणे:

  • भारतातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात, निर्यात आणि व्यापाराला चालना देण्यासाठी.

  • हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

  • कटिंग, पॉलिशिंग आणि प्रोसेसिंगसह डायमंड आणि ज्वेलरीशी संबंधित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी.

  • भारताला जगातील आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून विकसित करणे.

  • ही इमारत 65,000 हून अधिक हिरे तज्ञांसाठी सोयीस्कर केंद्र बनवण्याचे ध्येय आहे.

सुरत डायमंड बाॅर्समध्ये सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये 4,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासोबतच लोकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर विशेष सुरक्षा उपकरणेही लावण्यात आली आहेत.

सुरतचा हिरा उद्योग किती मोठा आहे?

जगात वापरले जाणारे 90 टक्के हिरे सुरतमध्ये कापले जातात आणि पॉलिश केले जातात. त्याची सरासरी उलाढाल सुमारे 3 लाख कोटी रुपये आहे. याद्वारे सुमारे 15 लाख लोकांना थेट रोजगार मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT