narendra modi sakal
Personal Finance

Rozgar Mela: 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, पंतप्रधानांच्या हस्ते होणार जॉईनिंग लेटरचं वाटप

Appointment Letter under Rozgar Mella: रोजगार मेळा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.

राहुल शेळके

Appointment Letter under Rozgar Mella: पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 नव्याने भरती झालेल्या लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. ही नियुक्तीपत्रे आज (सोमवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली जाणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.

पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार लोकांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस भरती या अंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

नियुक्तीपत्रांचे वाटप कधी होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्या 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे देतील. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान तरुणांनाही संबोधित करणार असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे. विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल

या भरतीमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसांनाही सक्षम केले जाणार आहे. यासोबतच दहशतवादाचा सामना करणे, अतिरेक्यांना सामोरे जाणे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणे यासाठी मदत होईल.

पीएमओच्या निवेदनात असे म्हटले आहे की रोजगार मेळा हा युवकांच्या सक्षमीकरणासाठी एक विशेष पाऊल आहे, ज्या अंतर्गत देशाच्या विकासात तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाईल. IGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे नवीन नियुक्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT