PM Modi to release 540 cr to build pucca houses in tribal areas
PM Modi to release 540 cr to build pucca houses in tribal areas Sakal
Personal Finance

PM Modi: पंतप्रधानांची आदिवासींना खास भेट! घरे बांधण्यासाठी देणार 640 कोटी; अशी आहे योजना

राहुल शेळके

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मकर संक्रांतीच्या दिवशी 'पीएम जन मन योजने' अंतर्गत 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करतील. या पैशातून देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी कायमस्वरूपी घरे बांधली जातील.

पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता जारी करतील. या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत 490,000 घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी 2,390 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

पीएम-जनमन योजना काय आहे?

15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान-जन मन योजना जाहीर करण्यात आली. त्याच दिवशी पंतप्रधानांनी झारखंडमधील खुटनी येथून विकास भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता.

फेब्रुवारी 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, असुरक्षित आदिवासी गटांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, पोषण आहार, रस्ते आणि उपजीविकेची व्यवस्था करण्यात येईल.

पुढील तीन वर्षांत यासाठी 15,000 कोटी रुपयांचे बजेट दिले जाणार आहे. रविवारी एका प्रसिद्धीपत्रकात, पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की पीएम-जन योजनेचे एकूण बजेट 24,104 कोटी रुपये आहे.

यामध्ये केंद्राचा हिस्सा 15,336 कोटी रुपये आणि राज्यांचा हिस्सा 8,768 कोटी रुपये आहे. यात नऊ मंत्रालयांमधील अकरा योजनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा झाल्यापासून नऊ मंत्रालयांनी 4,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गेल्या दोन महिन्यांत 12 लाख रुपये प्रतिकेंद्र दराने 916 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस 816 केंद्रे सुरू होतील.

2026 पर्यंत 126 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 2,500 अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याची सरकारची योजना आहे. त्याच कालावधीत 34 कोटी रुपयांच्या बजेटसह 1,000 वैद्यकीय युनिट्स उभारण्याची सरकारची योजना आहे. त्यापैकी 100 एमएमयू मंजूर झाले आहेत.

दळणवळण मंत्रालयाला 2026 पर्यंत सर्व वंचित गावे आणि वाड्यांमध्ये मोबाईल टॉवर बसवण्यासाठी 243 कोटी रुपये देण्यात आले आहेत. नोव्हेंबरपासून 503 गावांमध्ये 206 मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT