PM Narendra Modi and Bill Gates interact on AI, climate change, and women empowerment Key points Sakal
Personal Finance

PM Modi-Bill Gates: एआयपासून ते डिजिटल पेमेंट पर्यंत, बिल गेट्स आणि PM मोदी यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

PM Modi-Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदार आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी चर्चा झाली. या चर्चेची थीम 'एआय टू डिजिटल पेमेंट्स' आहे.

राहुल शेळके

PM Modi-Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदार आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी चर्चा केली. या चर्चेची थीम 'एआय टू डिजिटल पेमेंट्स' आहे. या संभाषणाचा टीझर 28 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होता. बिल गेट्स यांनी संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींना सांगितले की, भारताने पुढे आणलेल्या विषयांपैकी एक म्हणजे तंत्रज्ञान सर्वांसाठी असले पाहिजे. (From AI to digital payments, key points discussed by Bill Gates and PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आरोग्यापासून तंत्रज्ञान आणि हवामानापर्यंतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.

पीएम मोदी म्हणाले की, इंडोनेशियातील G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधींनी देशातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून घेण्यात रस दाखवला होता. मी त्यावेळी म्हणालो होतो की, आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, ते लोकांसाठी आहे त्यात कोणाची मक्तेदारी नाही.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी 2 लाख आरोग्य मंदिरे बांधली. आरोग्य क्षेत्र आणि रुग्णालये तंत्रज्ञानाशी जोडली. 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

संभाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतात डिजिटल विभाजन होऊ देणार नाहीत, डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जाणार. असा आमचा निर्धार आहे.

बिल गेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी नमो ड्रोन दीदीचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जेव्हा मी जगात डिजिटल विभाजनाबद्दल ऐकायचो तेव्हा मला अनेकदा वाटायचे की मी माझ्या देशात हे होऊ देणार नाही. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे.'

तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात महिला अधिक पुढाकार घेत आहेत. ते म्हणाले, 'मी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. आजकाल मी त्यांच्याशी बोलत आहे (ड्रोन वापरणाऱ्या स्त्रिया)…त्या खूप आनंदी आहेत.

बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला की भारताचा इतिहासच पर्यावरणपूरक राहिला आहे. आपण याचा सध्याच्या काळाशी कसा संबंध ठेवता? यावर पंतप्रधान म्हणाले की, माझे जॅकेट रिसायकल मटेरिअलचे बनलेले आहे.

ते म्हणाले की आम्ही प्रगतीचे मापदंड हवामान अनुकूल केले होते. कोरोनाच्या काळात लस बनवून ती देशभर आणि जगभर वितरित करण्याच्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही लोकांना शिक्षित करा आणि त्यांना सोबत घ्या. ही व्हायरस विरुद्ध सरकारची लढाई नसून जीवन विरुद्ध व्हायरसची लढाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT