Post Office vs SBI FD Sakal
Personal Finance

Post Office vs SBI FD: पोस्ट ऑफिस की SBI कुठे मिळतेय जास्त व्याज? जाणून घ्या

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी गेल्या काही महिन्यांत एफडी व्याजदरात वाढ केली आहे.

राहुल शेळके

Post Office vs SBI FD: आजही, गुंतवणुकीबद्दल विचार करताना बहुतेक लोक मुदत ठेव अर्थात एफडीचाच जास्त विचार करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, ज्यामध्ये हमीसह परतावा मिळतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी गेल्या काही महिन्यांत एफडी व्याजदरात वाढ केली आहे. यासोबतच पोस्ट ऑफिसकडून एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. यानंतर गुंतवणूकदारांना एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

देशातील सर्वात मोठी बँक SBI आणि पोस्ट ऑफिसमध्ये FD वर किती व्याज मिळत आहे. याची आज आपण घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसने 1 एप्रिलला व्याजदर वाढवले :

मार्चअखेरीस केंद्र सरकारने पोस्टाच्या सर्व लहान बचत योजनांवरील व्याज 0.10 टक्क्यांवरून 0.70 टक्के केले. यानंतर गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस एफडीवर 6.8 टक्के ते 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

  • 1 वर्षाच्या FD वर - 6.8 टक्के

  • 2 वर्षांच्या FD वर - 6.9 टक्के

  • 3 वर्षांच्या FD वर - 7.0 टक्के

  • 5 वर्षाच्या FD वर - 7.5 टक्के

FD वर SBI चा व्याजदर :

SBI बँकेकडून गुंतवणूकदारांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची ऑफर दिली जात आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे.

सामान्य नागरिकांना बँकेकडून एफडीवर व्याज

  • 7 दिवस ते 45 दिवस -3.00%

  • 46 दिवस ते 179 दिवस - 4.50%

  • 180 दिवस ते 210 दिवस - 5.25%

  • 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी - 5.75 टक्के

  • एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी - 6.80 टक्के

  • 400 दिवस (अमृत कलश) - 7.10 टक्के

  • दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी - 7.00 टक्के

  • तीन वर्षापासून ते पाच वर्षांपेक्षा कमी - 6.50 टक्के

  • पाच वर्षे ते दहा वर्षे - 6.50 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT