Post Office Kisan Vikas Patra Scheme know how to double money in 10 years  Sakal
Personal Finance

Post Office: पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना; 10 वर्षात तुमचे पैसे होतील दुप्पट, कसे ते जाणून घ्या

Post Office: कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते

राहुल शेळके

Post Office: शेअर बाजारात पैसे गुंतवणे प्रत्येकालाच विश्वासार्ह वाटते असे नाही. त्यामुळे अशा सगळ्यांसाठी किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra-KVP) हा एक चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिसची अतिशय चांगली बचत योजना मानली जाते. विशेष बाब म्हणजे किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते.

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत कोणतीही प्रौढ व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडू शकते. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलेही त्यांच्या स्वतःच्या नावाने किसान विकास पत्र खाते उघडू शकतात. अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीचे पालक खाते उघडू शकतात.

किसान विकास पत्र योजनेत किमान 1000 आणि 100 च्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. तुम्ही किसान विकास पत्रमध्ये हवे तितके पैसे गुंतवू शकता आणि खाती उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

किसान विकास पत्र खात्यावर वार्षिक 7.5% व्याज दिले जाते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल. याचा अर्थ जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 115 महिन्यांनंतर 2 लाख रुपये मिळतील. तर, जर तुम्ही किसान विकास पत्र खात्यात 10 लाख रुपये जमा केले तर त्याचे 20 लाख होतात.

किसान विकास पत्र खात्याचे फायदे खालीलप्रमाणे

- किसान विकास पत्र योजनेचा शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम होत नाही.

- पीओ स्कीमवर सरकारी हमी आहे, त्यामुळे तुम्हाला परतावा मिळेल की नाही याची काळजी करण्याची गरज नाही.

- किसान विकास पत्र खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.

- किसान विकास पत्र खाते 115 महिन्यांत परिपक्व होते पण तुम्ही खात्यातून पैसे काढेपर्यंत तुम्हाला व्याज मिळत राहील.

- तुम्ही किसान विकास पत्राद्वारे सुरक्षित कर्ज घेऊ शकता.

- किसान विकास पत्र खाते उघडताना, आधार कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

- तुम्ही तुमचे किसान विकास पत्र खाते हस्तांतरितही (Transfer) करू शकता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT