Post Office Scheme sakal
Personal Finance

Post Office Scheme : पोस्ट ऑफीसची दमदार स्कीम, सुरक्षित परतावा ; शिवाय गरज पडल्यास कर्ज मिळण्याची सोय...

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) हा स्‍मॉल सेविंग्‍सचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. हे अकाउंट तुम्ही कस्‍टमर पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडू शकता. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम जमा करावी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) हा स्‍मॉल सेविंग्‍सचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. हे अकाउंट तुम्ही कस्‍टमर पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडू शकता. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. पोस्ट ऑफिस आरडीवर सध्या 6.7 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिस आरडी खात्यावर केवळ व्याजच नाही, तर गरजेनुसार कर्जही मिळते.

आरडी खाते पोस्ट ऑफिसमध्ये किमान मासिक हप्त्याने 100 रुपयांसह उघडता येते. यामध्ये कोणतीही मॅक्सिमम डिपॉझिट लिमिट नाही. आरडी 3 वर्षांनंतर वेळेपूर्वी बंद (Premature Closing) करता येऊ शकते. याशिवाय, मॅच्युरिटीनंतर खाते आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याची सुविधा आहे.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, जर आरडी खात्यामध्ये 12 हप्ते जमा केले गेले असतील आणि 1 वर्ष चालू राहिल्यानंतर खाते बंद केले गेले नसेल, तर खातेदार कर्ज घेऊ शकतात. नियमांनुसार, आरडीमधील शिल्लक रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते.

पोस्ट ऑफिस आरडीवर कर्ज घेण्याचा व्याजदर बँकांकडून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) तुलनेत कमी आहे. आरडी खात्यावरील कर्जावरील व्याज हे आरडी खात्यातील ठेवींवरील व्याजदरापेक्षा 2% जास्त आहे (RD खात्यावरील व्याज 2% आहे). सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर वार्षिक व्याजदर 6.7 टक्के आहे, म्हणजे कर्ज घेतल्यास, कर्जावरील व्याजदर 8.7 टक्के असेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT