Raghuram Rajan Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: रघुराम राजन मोदी सरकारच्या 'या' योजनेचे झाले फॅन; दिला महत्त्वाचा सल्ला

Job Condition in India: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे की, सात टक्के आर्थिक वाढीसह भारतात पुरेशा नोकऱ्या निर्माण होत नाहीत. काही राज्यांतील रिक्त जागांसाठी अर्जदारांच्या संख्येवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

राहुल शेळके

Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे की, सात टक्के आर्थिक वाढीसह भारतात पुरेशा नोकऱ्या निर्माण होत नाहीत. काही राज्यांतील रिक्त जागांसाठी अर्जदारांच्या संख्येवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी सुचवले की सरकारने रोजगार निर्मितीसाठी कामगार-केंद्रित उद्योगांना चालना देण्यावर भर देणे आवश्यक आहे.

सात टक्के दराने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था पुरेसा रोजगार निर्माण करत आहे का, असा प्रश्न राजन यांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, भांडवल-केंद्रित उद्योग अधिक वेगाने वाढत आहेत. परंतु कामगार-केंद्रित उद्योगांच्या बाबतीत असे नाही. त्यामुळे कामगार-केंद्रित उद्योगांवर भर देणे गरजेचा आहे.

आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की, खालच्या स्तरावर सर्व काही ठीक नाही. माझ्या मते नोकऱ्यांची नितांत गरज आहे. राजन यांनी सांगितले की, सरकारी नोकऱ्यांसाठी पदांची संख्या कमी आणि अर्जांची संख्या खूप जास्त आहे.

मोदी सरकारच्या 'या' योजनेचे राजन झाले फॅन

ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत सहा-सात टक्के दराने वाढेल. राजन यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अप्रेंटिसशिप योजनांचे स्वागत केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात अप्रेंटिसशिप योजनांची घोषणा केली होती. सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेवर (EPFO) आधारित तीन रोजगार-संबंधित योजना सुरू केल्या आहेत. राजन म्हणाले की, आपण या (कामगार-केंद्रित उद्योग) अतिशय काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे, आपण यापासून दूर राहू शकत नाही.

राजन म्हणाले की, महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताकडे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा घेण्यासाठी 15 वर्षांचा कमी कालावधी आहे आणि ही संधी गमावू नये.

यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याबद्दल राजन म्हणाले की, फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे केंद्रीय बँकांना योग्य वाटेल त्या पद्धतीने पुढे जाण्यास वाव मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : शिरपूरमध्ये विद्युत तारांमुळे आग! एक एकरातील बांबू जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT