Raghuram Rajan Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी अर्थमंत्र्यांना दिला मोलाचा सल्ला; काय म्हणाले RBIचे माजी गव्हर्नर?

Raghuram Rajan's Advice: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पासाठी संसदीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टला संपणार आहे.

राहुल शेळके

Nirmala Sitharaman Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पासाठी संसदीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टला संपणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

यावेळी सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मोदी सरकार युवक, कृषी आणि शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थसंकल्पापूर्वी अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, शाश्वत आर्थिक वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी भारताने उत्पादन क्षेत्राच्या विस्तारापेक्षा आपल्या सेवा क्षेत्राला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

वार्षिक जागतिक बँकेच्या परिषदेत बोलताना, ते म्हणाले की उत्पादन क्षेत्रात मर्यादित निर्यात आणि चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मेक्सिको सारख्या देशांकडून स्पर्धा यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. ते म्हणाले, "राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या, उत्पादनाची शिडी चढणे कठीण आहे."

भारताने शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, चांगल्या संधी मिळविण्यासाठी नाविन्य आणि सर्जनशीलता वाढवणे महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मिती ही भारताची प्राथमिकता असायला हवी. ते म्हणाले, “अधिक नोकऱ्या ही काळाची गरज आहे” कारण नवीन नोकऱ्या आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी चिंतेचा विषय आहेत.

राजन यांच्या मते, भारत सरकारने केवळ उच्च पदांवरच नव्हे तर सर्व स्तरांवर रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. कौशल्य वाढवून आणि प्रशिक्षण देऊन सध्याच्या नोकरीची उपलब्धता आणि भविष्यातील रोजगार संधी या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT