Ram Mandir Inauguration coco cola to hajmola ambani adani reached ayodhya for Marketing  Sakal
Personal Finance

राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन

Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिर सोहळ्याचा दिवस हळूहळू जवळ येत आहे. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत. याआधी 16 जानेवारीपासून इतर अनेक विधी सुरू झाले आहेत.

राहुल शेळके

Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिर सोहळ्याचा दिवस हळूहळू जवळ येत आहे. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत. याआधी 16 जानेवारीपासून इतर अनेक विधी सुरू झाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी असणार आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी देण्याचा आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

या सोहळ्यासाठी देशभरातून 10 लाख यात्रेकरू मोठ्या संख्येने अयोध्येला पोहोचणार आहेत असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत उद्योजकांनाही या सोहळ्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी दिसत आहेत. कोका-कोलापासून बिसलेरी, हाजमोला ते पार्ले कंपन्या अयोध्येत येणार आहेत.

हाजमोलाचे मोफत वाटप

डाबर ग्रुप आपल्या लोकप्रिय ब्रँड ‘हाजमोला’चे प्रमोशन करण्यासाठी अनोख्या पद्धतीने जाहिरात करणार आहे. 22 डिसेंबर 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार्‍या पाहुण्यांना विविध ठिकाणी हाजमोलाचे मोफत वाटप केले जाणार आहे.

कोका-कोला 'टेम्पल थीम' लाँच

कोकाकोलाने प्रमोशन करण्यासाठी ‘मंदिर थीम’ लाँच केली आहे. आतापर्यंत कंपनीने आपल्या ब्रँडिंगमध्ये नेहमीच 'लाल' रंग वापरला होता, परंतु आता कंपनीने त्याऐवजी ब्राउन थीममध्ये ब्रँडिंग करणार आहे. इतकंच नाही तर कंपनीने राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर 50 हून अधिक वेंडिंग मशीन्स बसवल्या आहेत.

अदानी-अंबानीही स्पर्धेत

मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि गौतम अदानी यांच्या 'फॉर्च्यून' ब्रँडनेही तयारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या 'कॅम्पाकोला' ब्रँडचे अयोध्येमध्ये मार्केटिंग करणार आहे. तर अदानी विल्मार आपल्या ‘फॉर्च्यून’ ब्रँड उत्पादनांचे प्रमोशन करण्यावर भर देत आहे. ITC कंपनी अयोध्येत आपल्या 'मंगलदीप' अगरबत्ती ब्रँडचा प्रचार करत आहे.

कंपन्यांनी केवळ ब्रँडिंगसाठी अयोध्येत होर्डिंग्ज लावले नाहीत. किंबहुना त्यांनी अनेक ठिकाणी आपले किऑस्कही उभारले आहेत. याशिवाय शरयूच्या काठावर अनेक कंपन्यांनी चेंजिंग रुम्स बनवले आहेत, ज्यावर त्यांनी त्यांचे ब्रँडिंग केले आहे. बिसलेरी, पार्ले, इमामी असे अनेक ब्रँड अयोध्येत पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT