cyber attack 
Personal Finance

Banks Ransomware Attack: 300 पेक्षा जास्त बँकांच्या सर्व्हरमध्ये शिरला व्हायरस; UPI पेमेंट बंद, तुम्ही तपासलं का?

Ransomware attack on small banks in India: सायबर हल्ल्यानंतर तात्काळ पाऊलं उचलण्यात आले आहेत. काही काळासाठी या बँकेच्या पेमेंट सेवा बंद करण्यात आल्या होत्या.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतातील ३०० पेक्षा जास्त बँकांच्या पेमेंट सेवेवर परिणाम करणारी घटना घडली आहे. बँकाच्या सर्व्हरमध्ये रॅनसमवेअर या व्हायरसने प्रवेश केल्यामुळे भारतातील स्थानिक बँकाना पेमेंट प्रक्रिया थांबवावी लागली आहे. माहितीनुसार, जवळपास ३०० बँकाना C-Edge Technologies नावाची कंपनी सर्व्हिस पुरवते. या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे.

रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सायबर हल्ल्यानंतर तात्काळ पाऊलं उचलण्यात आले आहेत. काही काळासाठी या बँकेच्या पेमेंट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. C-Edge Technologies कंपनीकडून यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील यासंदर्भात माहिती देण्यास नकार दिला आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया National Payment Corporation of India (NPCI) देशातील पेमेंट सेवेवर लक्ष देत असते. NPCI ने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते. यात सांगण्यात आलं होतं की, तात्पुरत्या काळासाठी C-Edge Technologies ला बँकांचे पेमेंट सर्व्हर अॅक्सेस करण्यापासून रोखण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून ग्राहकांना या काळापुरता UPI पेमेंट सेवेचा लाभ घेता येणार नव्हता.

धोका वाढू नये यासाठी C-Edge Technologies कंपनीची सुविधा घेण्यावर बंदी आणण्यात आली आहे. तात्पुरत्या काळासाठी ही बंदी असेल. व्हायरसचे निराकरण झाल्यानंतर पुन्हा सुविधा पुरवली जाईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास ३०० छोट्या बँकांवर याचा परिणाम झाला आहे. विशेष करून या बँका मोठ्या शहरांच्या बाहेरच्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला नाही. कारण, या बँकामध्ये केवळ ०.५ टक्के ग्राहक UPI पेमेंटची सेवा घेतात. सायबर हल्ला कोणी केला हे शोधण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी NPCI ने कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारतीय सायबर अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आर्थिक संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बँकांना सतर्क केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT