Raymond Loses Rs 1,500 Crore of Market Capitalisation As Chairman Gautam Singhania’s Separation From Wife  Esakal
Personal Finance

पती-पत्नीच्या घटस्फोटामुळे कंपनीला मोठा झटका; 10 दिवसांत गुंतवणूकदारांचे 1,500 कोटी पाण्यात

Raymond Loses Rs 1,500 Crore: गेल्या 10 दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1500 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Raymond Loses Rs 1,500 Crore: रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया सध्या चर्चेत आहेत. दिवाळी पार्टीनंतर त्यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती. 58 वर्षीय उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यात सुरू असलेल्या वादाचा परिणाम रेमंडच्या व्यवसायावरही झाला आहे. गेल्या 10 दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1500 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

घटस्फोटाबाबत गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांच्यात सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता रेमंड ग्रुपच्या शेअर्सवरही होत आहे. कंपनीचे शेअर्स गुरुवारी घसरले आणि 1667.20 रुपयांच्या पातळीवर बंद झाले.

गेल्या पाच दिवसांत हा शेअर आठ टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे, कंपनीचे मार्केट कॅप कमी झाले आहे. मार्केट कॅप 1500 कोटी रुपयांनी कमी होऊन ते 11,009 कोटी रुपये झाले आहे.

गौतम सिंघानिया-नवाज मोदी 32 वर्षांनंतर वेगळे होणार

रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी 13 नोव्हेंबर रोजी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. पोस्ट लिहिताना त्यांनी सांगितले होते की, 32 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता दोघे वेगळे होत आहेत.

गौतम सिंघानिया आणि कुटुंबाची एकूण संपत्ती 11,620 कोटी रुपयांची आहे, त्यांची रेमंड ग्रुपमध्ये अर्धी भागीदारी आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, 13 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वादामुळे आणि कंपनीच्या शेअर्सवर झालेल्या परिणामामुळे सिंघानिया कुटुंबाची हिस्सेदारी सुमारे 12 टक्क्यांनी कमी झाली आहे. रेमंड ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेटपर्यंत विस्तारलेला आहे. कंपनीचा 40 टक्के महसूल कपड्यांच्या व्यवसायातून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT