rupees 2000 note sakal
Personal Finance

RBI : दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरच्या रात्री १२ नंतर होणार चलनातून बाहेर

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रात्री १२ वाजता नंतर दोन हजार च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रात्री १२ वाजता नंतर दोन हजार च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी अधिसूचना जारी केली असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या महसुलातील रोख रकमेत दोन हजाराच्या नोटा असल्यास वेळेत बँकेत भरण्याच्या सूचना दिल्या आहे.

महामंडळाकडे जमा होणाऱ्या दोन हजाराच्या चलनी नोटा चलनातून बंद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये जमा झालेल्या रोख रकमेत दोन हजाराच्या नोटा तर नाही ना याची माहिती घेण्यात यावी. अशा रकमेचा तातडीने बँकेत भरण्यात यावे.

जेणे करून ३० सप्टेंबर नंतर अशा नोटांचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे बुधवार दिनांक २८ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री पर्यंतच दोन हजाराच्या नोटा स्विकारल्या जाव्यात. तर २८ सप्टेंबर रोजी पर्यंत संकलन झालेल्या नोटा लगेच दुस-या दिवशी २९ सप्टेंबर पर्यंत त्या आगारातील संबंधित बँक खात्यात जमा करण्यात याव्यात.

२८ सप्टेंबरच्या मध्यरात्री नंतर कोणत्याही परिस्थितीत दोन हजार च्या नोटा स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याकरीता सर्व विभाग नियंत्रक यांनी अधिनस्थ आगार पातळीवर सुचना देऊन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करुन घ्यावी.

शिवाय २८ सप्टेंबर च्या मध्यरात्री नंतर दोन हजारच्या नोटा स्विकारल्यास व त्यांचा बँक भरणा करणे राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सबंधित विभागाची राहील असा इशारा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?

Latest Marathi News Live Update : एप्रिलच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर; पाणीटंचाईचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT