RBI Action on Visa-Mastercard
RBI Action on Visa-Mastercard Sakal
Personal Finance

RBI Action: व्हिसा आणि मास्टरकार्डवर आरबीआयची मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

राहुल शेळके

RBI Action on Visa-Mastercard: व्हिसा आणि मास्टरकार्डसारख्या आंतरराष्ट्रीय पेमेंट कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. व्हिसा आणि मास्टरकार्डवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेने त्यांना कार्डद्वारे बिझनेस पेमेंट थांबवण्यास सांगितले आहे. कारवाईनंतर दोन्ही पेमेंट कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

रिझर्व्ह बँकेने व्हिसा आणि मास्टरकार्ड या प्रमुख कार्ड कंपन्यांना थर्ड पार्टी ॲप्सद्वारे मनी ट्रान्सफर आणि पेमेंट यासारखे B2B व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कारवाईमागचे कारण रिझर्व्ह बँकेने अद्याप सांगितलेले नाही. (Visa, Mastercard to stop card-based B2B payments via third party fintech platforms)

मात्र, ज्यांचे केवायसी झालेले नाही अशा कंपन्यांना कार्डचा वापर करून पेमेंट केले जात असल्याची माहिती आहे. याशिवाय काही मोठ्या व्यवहारांमध्ये फसवणूक आणि मनी लाँड्रिंग झाल्याचा रिझर्व्ह बँकेला संशय होता. मात्र, या बंदीचा थेट परिणाम केवळ थर्ड पार्टी ॲप्सद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर होणार आहे.

मिंटच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की या पद्धतीने केवळ मर्यादित प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात आणि त्याचा परिणाम खूपच मर्यादित असेल. इतर कॉर्पोरेट व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

रिझर्व्ह बँकेने 8 फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. रिझर्व्ह बँकेने व्हिसा आणि मास्टरकार्डला कंपन्यांनी कार्डद्वारे केलेली बिझनेस पेमेंट निलंबित करण्यास सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत बिझनेस पेमेंट सोल्युशन प्रोव्हायडर (BPSP) चे सर्व व्यवहार निलंबित करण्यास सांगितले आहे. बँका असे कार्ड मोठ्या कॉर्पोरेट्सना देते. मोठे कॉर्पोरेट्स छोट्या कंपन्यांना पेमेंट करण्यासाठी या कार्डचा वापर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT