RBI cancels licence of The Hiriyur Urban Co-operative Bank citing weak financials  Sakal
Personal Finance

RBI Action: आता आणखी एक बँक होणार बंद; RBI ने परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

RBI Cancelled Bank Licence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. 27 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे, RBI ने सुमेरपूर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सुमेरपूर, पाली, राजस्थानचा परवाना रद्द केला आहे.

राहुल शेळके

RBI Cancelled Bank Licence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. 27 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे, RBI ने सुमेरपूर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सुमेरपूर, पाली, राजस्थानचा परवाना रद्द केला आहे.

28 फेब्रुवारी 2024 पासून बँकिंग व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश बँकेला देण्यात आला आहे. या संदर्भात मध्यवर्ती बँकेने राजस्थानच्या सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करून त्यासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंतीही केली आहे.

बँकेला व्यवसाय करण्याची परवानगी नाही

बँकेला गुरुवारपासून ठेवी स्वीकारण्याची आणि ठेवी परत करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. अशा परिस्थितीत, ते कलम 56 तसेच बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 11 (1) आणि कलम 22 (3) (d) च्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. (RBI cancels licence of Rajasthan-based Sumerpur Mercantile Urban Coop Bank)

ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

सुमेरपूर मर्कंटाईल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ग्राहकांच्या पैशाचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे डीआयसीजी कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विम्याचा लाभ मिळेल. बँकेच्या 99.13 टक्के ठेवीदारांना DICGC ठेवींचा लाभ मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

ज्या ग्राहकांनी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेले ग्राहक केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतात.

आरबीआयच्या मते, बँकेचे अस्तित्व ठेवीदारांच्या हितासाठी चांगले नाही. सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे ही बँक आपल्या ठेवीदारांची परतफेड करू शकत नाही. बँकेला व्यापार करु दिल्यास त्याचा जनहितावर विपरीत परिणाम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT