RBI cancels licence of The Hiriyur Urban Co-operative Bank citing weak financials  Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

RBI Action: "बँकेचे अस्तित्व तिच्या ठेवीदारांसाठी चांगले नाही कारण बँक, तिच्या सद्य आर्थिक स्थितीमुळे तिच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण ठेवी देऊ शकणार नाही," असे आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राहुल शेळके

RBI Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 12 जानेवारी रोजी सांगितले की, बँकेच्या खराब आर्थिक स्थितीमुळे हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे.

"बँकेचे अस्तित्व तिच्या ठेवीदारांसाठी चांगले नाही कारण बँक, तिच्या सद्य आर्थिक स्थितीमुळे तिच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण ठेवी देऊ शकणार नाही," असे आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल. असेही आरबीआयने सांगितले.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI ने सांगितले की, परवाना रद्द केल्यानंतर, बँकेला 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास मनाई आहे. तसेच बँक यापुढे ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करु शकणार नाही.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) डीआयसीजीसी कायदा 1961 च्या तरतुदींनुसार प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींच्या 5 लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंतच्या ठेवींच्या दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.

ग्राहकाला पूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे का?

बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 99.93 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 224.53 लाख रुपये आधीच दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT