RBI  Sakal
Personal Finance

RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! दोन NBFC कंपन्यांची नोंदणी केली रद्द; काय आहे कारण?

RBI Cancels NBFC Registration: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. एकीकडे आरबीआय बँकांवर निष्काळजीपणासाठी दंड आकारत आहे. दुसरीकडे, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रेही रद्द करण्यात आली आहेत.

राहुल शेळके

RBI Cancels NBFC Registration: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. एकीकडे आरबीआय बँकांवर निष्काळजीपणासाठी दंड आकारत आहे. दुसरीकडे, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रेही रद्द करण्यात आली आहेत. आरबीआयने अशा दोन कंपन्यांवर मोठी कारवाई करत त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. कंपन्यांनी आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या दोन कंपन्या कोणत्या आहेत ज्यांच्या विरोधात आरबीआयने कारवाई केली आहे ते जाणून घेऊया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज देण्याच्या अनियमित पद्धतींमुळे स्टार फिनसर्व्ह इंडिया आणि पॉलिटेक्स इंडिया या दोन नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. केंद्रीय बँकेने सोमवारी ही माहिती दिली.

हैदराबादस्थित स्टार फिनसर्व्ह इंडिया ‘प्रोगकॅप’ (डेसिडेराटा इम्पॅक्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि संचालित) अंतर्गत सेवा पुरवत होती. पॉलीटेक्स इंडिया, मुंबईत मुख्यालय असलेले, ‘Z2P’ मोबाइल ऍप्लिकेशन (Zytek Technologies Pvt. Ltd. च्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले) अंतर्गत सेवा पुरवत होती.

स्टार फिनसर्व्हचे नोंदणी प्रमाणपत्र (CoR) रद्द करण्याच्या कारणांचे स्पष्टीकरण देताना, रिझर्व्ह बँकेने सांगितले की कंपनीने कर्ज मूल्यांकन, कर्ज मंजूरी तसेच KYC पडताळणी प्रक्रिया यासारख्या सेवा आउटसोर्स केल्या आहेत.

पॉलिटेक्सने KYC पडताळणी, क्रेडिट मूल्यांकन, कर्ज वाटप, कर्ज वसुली, कर्जदारांचा पाठपुरावा आणि कर्जदारांच्या तक्रारींची दखल घेणे आणि त्यांचे निराकरण करणे यासंबंधीचे मुख्य निर्णय घेण्याचे काम आऊटसोर्स केले.

आरबीआयने सांगितले की पॉलिटेक्स इंडियाने कर्ज देण्याशी संबंधित काम आउटसोर्सिंग करताना नियमांचे उल्लंघन केले. काही प्रकरणांमध्ये त्यांनी सेवा पुरवठादाराकडून जास्त व्याज देखील घेतले आहे. ही सर्व क्रिया RBI च्या फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे.

नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर दोन्ही संस्था यापुढे नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेचा (NBFI) व्यवसाय करणार नाहीत, असे RBI ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT