RBI Claims Note Continue To Be Legal Tender 97 percent Of Rs 2,000 Currency Notes Back In System Sakal
Personal Finance

2000 Rupees Notes: 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या; 2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर

RBI 2000 Rupees Notes Update: 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. आरबीआयने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राहुल शेळके

RBI 2000 Rupees Notes Update: 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. आरबीआयने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 19 मे 2023 रोजी RBI ने देशातून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की 2000 रुपयांच्या नोटा देशात कायदेशीर निविदा राहतील, म्हणजेच आता आरबीआयने या नोटा चलनातून बाहेर काढल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे नोटांना पूर्णपणे नोटाबंदीच्या कक्षेत आणले गेले नाही. (RBI Claims Note Continue To Be Legal Tender 97 percent Of Rs 2,000 Currency Notes Back In System)

आज अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, आरबीआयने म्हटले आहे की 19 मे 2023 रोजी देशात 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा आकडा 8470 कोटी रुपयांवर आला आहे, म्हणजेच 2000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97.62 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा दिली होती, तरीही अनेकांना 2000 रुपयांच्या नोटा परत करता आल्या नाहीत. हे पाहता RBI ने त्यांना परत करण्याची मुदत 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवली होती आणि त्यानंतर 09 ऑक्टोबर 2023 पासून RBIने सांगितलेली कार्यालये लोकांकडून 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत.

RBI ने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात असलेल्या सर्व 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज पूर्ण करण्यासाठी 2,000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT