RBI Fines  Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 2 बँका आणि 3 वित्त कंपन्यांना ठोठावला लाखोंचा दंड; काय आहे कारण?

RBI Fines Banks: सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआय कोणत्याही बँकेवर कारवाई करू शकते. गेल्या काही दिवसांपासून आरबीआय ॲक्शन मोडमध्ये आहे.

राहुल शेळके

RBI Fines Banks: सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआय कोणत्याही बँकेवर कारवाई करू शकते. गेल्या काही दिवसांपासून आरबीआय ॲक्शन मोडमध्ये आहे. सोमवारी 12 जुलै रोजी आरबीआयने 5 मोठ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. या 5 कंपन्यांमध्ये 2 बँका आणि 3 वित्त कंपन्यांचा समावेश आहे. RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे.

CSB बँक

RBI ने CSB बँकेला 1.86 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वित्तीय सेवांच्या आऊटसोर्सिंगमधील जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहिता संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

RBI ने युनियन बँक ऑफ इंडियाला 1.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. युनियन बँकेला नो युवर कस्टमरशी (केवायसी) संबंधित काही नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुथूट हाऊसिंग फायनान्स

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुथूट हाऊसिंग फायनान्सला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या - गृहनिर्माण वित्त कंपन्या (रिझर्व्ह बँक) सूचना, 2021' च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

निडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड

आरबीआयने निडो होम फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर RBI ने अशोका विनियोग लिमिटेड कंपनीला 3.1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने म्हटले आहे की आर्थिक व्यवहारांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल या दोन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT