RBI Penalty on Banks Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआयने 'या' बँकेवर केली मोठी कारवाई; नियमांचे पालन न केल्याबद्दल ठोठावला लाखो रुपयांचा दंड

RBI Action HSBC Bank: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल RBI ने हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) वर 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राहुल शेळके

RBI Action HSBC Bank: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल RBI ने हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) वर 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रुपी डिनोमिनेटेड को-ब्रँडेड प्रीपेड कार्डच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल HSBC बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे केंद्रीय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

RBI च्या मते, 31 मार्च 2022 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी करण्यात आली. त्यात आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्या संदर्भात बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामध्ये बँकेला कारणे देण्यास सांगण्यात आले होते, या सूचनांचे पालन न केल्याने बँकेला दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती.

आरबीआयने म्हटले आहे की नोटीसला बँकेचा प्रतिसाद, वैयक्तिक हजेरी दरम्यान दिलेले तोंडी उत्तर आणि बँकेने दिलेली अतिरिक्त माहिती लक्षात घेतल्यानंतर असे आढळून आले की, इतर गोष्टींबरोबरच, बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यासाठी आर्थिक दंड आकारणे आवश्यक होते.

आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा उद्देश नाही. आर्थिक दंड लादल्याने RBI ने बँकेविरुद्ध सुरू केलेल्या इतर कारवाईचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर विपरीत परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varinder Singh Ghuman : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी 'ही' तारीख महत्त्वाची; कर्मचाऱ्यांना होणार दुप्पट फायदा

Latest Marathi News Live Update: कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल

INDW vs SAW: भारताची 'संकटमोचक' ऋचा घोषचं शतक ६ धावांनी हुकलं, पण नावावर झाले ३ मोठे विक्रम

Israel announces Gaza ceasefire : ‘’२४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी’’ ; अखेर इस्रायलने केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT