RBI Action On Yes Bank: Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआयने येस बँकेला ठोठावला फक्त 500 रुपयांचा दंड; काय आहे कारण?

RBI Action On Yes Bank: येस बँकेच्या शेअर्समध्ये बुधवारी 14 ऑगस्ट रोजी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झाली. दरम्यान, येस बँकेबाबत एक मजेदार बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राहुल शेळके

RBI Action On Yes Bank: येस बँकेच्या शेअर्समध्ये बुधवारी 14 ऑगस्ट रोजी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झाली. दरम्यान, येस बँकेबाबत एक मजेदार बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. फाटलेल्या नोटांची योग्य प्रकारे हाताळणी न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

येस बँकेने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून 13 ऑगस्ट 2024 रोजी एक पत्र प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की आरबीआयने फाटलेल्या नोटांच्या अनियमिततेसाठी बँकेला रु 500/- चा आर्थिक दंड ठोठावला आहे.

याशिवाय आज स्टेक विकण्याच्या प्लॅनच्या बातम्यांमुळे येस बँकेचे शेअर्सही फोकसमध्ये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस येस बँकेतील आपला संपूर्ण 24 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे. या भागविक्रीतून बँकेला सुमारे 18,420 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

जपानी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प (एसएमबीसी) आणि दुबईची एमिरेट्स एनबीडी येस बँकेतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहेत. सुमितोमो मित्सुई ही जपानमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे आणि ती सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपचा भाग आहे.

दोन्ही बोलीदारांनी येस बँकेतील 51 टक्के बहुसंख्य भागभांडवल खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. जेणेकरुन त्यांचे बँकेच्या व्यवसायावर नियंत्रण असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) या प्रस्तावाला मौखिक मान्यता दिली असून योग्य प्रक्रिया सुरू आहे.

येस बँकेला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मार्च 2020 मध्ये एसबीआयसह अनेक भारतीय बँकांनी आरबीआयच्या विनंतीवरून येस बँकेत हिस्सा खरेदी केला होता. येस बँकेत सध्या SBI ची 24 टक्के हिस्सेदारी आहे. तर ICICI बँक आणि HDFC बँक यांचे संयुक्तपणे 9.74 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय आणखी 9 भारतीय बँकांची येस बँकेत हिस्सेदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नेक्सो सेंटर ड्रग्स पार्टी प्रकरण; आनंद पटेल कल्याणहून अटकेत

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT