RBI imposes monetary penalty on HDFC Bank, Bank of America and others for rule violation
RBI imposes monetary penalty on HDFC Bank, Bank of America and others for rule violation  Sakal
Personal Finance

RBI Action: रिझर्व्ह बँकेने HDFC, BOAला ठोठावला दंड; सहकारी बँकांवरही केली कारवाई, काय आहे प्रकरण?

राहुल शेळके

RBI Action: नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ अमेरिका आणि एचडीएफसी बँक लिमिटेडला प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठवडाभरात बँका आणि सहकारी संस्थांवर आरबीआयने केलेली ही दुसरी कारवाई आहे.

HDFC बँक आणि बँक ऑफ अमेरिका यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही बँका अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पैसे जमा करण्याच्या नियमांचे उल्लंघन करत होत्या. आरबीआयच्या म्हणण्यानुसार दोन्ही बँका फेमा कायद्याचे योग्य प्रकारे पालन करत नाहीत.

तीन सहकारी बँकाही आरबीआयच्या रडारवर आल्या आहेत. यामध्ये गुजरातच्या ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेवर ठेवींशी संबंधित नियमांचे योग्य पालन न केल्याचा आरोप आहे.

याशिवाय अहमदाबादच्या मंडल नागरीक सहकारी बँकेला दीड लाख रुपये आणि बिहारच्या पाटलीपुत्र सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मध्यवर्ती बँक गेल्या काही काळापासून बँका आणि सहकारी बँकांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्यामुळे या बँकांवर दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. आरबीआयने या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रिझर्व्ह बँकेने घेतला अभ्युदय सहकारी बँकेचा ताबा

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात एक वर्षासाठी अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ हटवण्याची घोषणा केली. मात्र, बँकेच्या कारभारावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.

सेंट्रल बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची अभ्युदय सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय सल्लागारांची समितीही नेमण्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे म्हणणे आहे की, अभ्युदय सहकारी बँकेच्या कारभाराच्या दर्जामुळे ही कारवाई करणे भाग पडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Narendra Modi: जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर कंगनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते..."

Akola News : उद्योजकांची पिळवणूक थांबवावी;एमआयडीसी प्लॉट ओनर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Whatsapp Ban : या सहा देशांनी घातलीये व्हॉट्सॲपवर बंदी; चुकून वापरलं तर थेट जेल,जाणून घ्या का आहे अशी जबरदस्ती

SCROLL FOR NEXT