RBI Penalty Sakal
Personal Finance

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

YES Bank and ICICI Bank: रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई करत कोटींचा दंड ठोठावला आहे.

राहुल शेळके

YES Bank and ICICI Bank: रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई करत कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला 91 लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दंड का ठोठावण्यात आला?

आरबीआयने अलीकडेच सांगितले की दोन्ही बँका अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहक सेवा आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी अनेक प्रकरणे आरबीआयसमोर आली ज्यात बँकेने अपुऱ्या शिलकीमुळे अनेक खात्यांमधून शुल्क वसूल केले. तसेच कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे केली जात होती.

आरबीआयला आपल्या मूल्यांकनात असे आढळले की येस बँकेने 2022 या वर्षात अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या नावे काही अंतर्गत खाती उघडली आणि चालवली होती. त्यामुळे बँकेला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँकेवर काय आरोप आहेत?

ICICI बँक कर्ज आणि ऍडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. यासाठी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेने अपूर्ण तपासाच्या आधारे अनेक कर्ज मंजूर केले, त्यामुळे बँकेला आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला.

आरबीआयच्या तपासात बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या. बँकेने अनेक प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड क्षमता न तपासता कर्ज मंजूर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT