RBI Fines  Sakal
Personal Finance

RBIची मोठी कारवाई! बँक ऑफ महाराष्ट्रसह हिंदुजा लेलँड फायनान्स आणि पूनावाला फिनकॉर्पला ठोठावला दंड; कारण काय?

RBI Imposes Penalty On Bank Of Maharastra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ महाराष्ट्रला दंड ठोठावला आहे. बँकेने कर्ज प्रणाली, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट आणि KYC बाबतच्या नियमांचे बँकेने पालन न केल्यामुळे RBI ने हा दंड ठोठावला आहे.

राहुल शेळके

RBI Imposes Penalty: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. जेव्हा एखादी बँक RBI च्या नियमांकडे दुर्लक्ष करते तेव्हा मध्यवर्ती बँक त्यावर दंड आकारू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन बँकांना दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ महाराष्ट्रला दंड ठोठावला आहे. बँकेने कर्ज प्रणाली, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट आणि KYC बाबतच्या नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने हा दंड ठोठावला आहे. RBIने बँक ऑफ महाराष्ट्रला 1,27,20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

31 मार्च 2023 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासली आणि मे 2023 पर्यंत बँकेच्या माहिती तंत्रज्ञानाचीही तपासणी करण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तपासणी दरम्यान, बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावून बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली.

आरबीआयने सांगितले की नोटीसला उत्तर दिल्यानंतर, वैयक्तिक सुनावणी आणि बँकेने दिलेल्या तथ्यांची तपासणी केल्यानंतर, आरबीआयला असे आढळले की बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. बँकेवर लावण्यात आलेला दंड कोणत्याही पूर्वग्रहाने ठोठावण्यात आलेला नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

याशिवाय, KYC मार्गदर्शक तत्त्वे, 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडला 4.90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यासोबतच केंद्रीय बँकेने पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. निवेदनानुसार, ही कारवाई रिझर्व्ह बँकेचे नियम न पाळल्यामुळे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT