Digital Rupee Sakal
Personal Finance

Digital Rupee: भारतात डिजिटल रुपया होणार लॉन्च? RBI ने केली मोठी घोषणा

Digital Rupee: देशात डिजिटल रुपयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राहुल शेळके

Digital Rupee: देशात डिजिटल रुपयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे.

"रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करेल," अजय कुमार चौधरी यांनी जी 20 शिखर परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

RBI ने सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.

सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) बाजारात जसजसे वाढत जाईल, तसतशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना डिजिटल सुरक्षेवर काम करावे लागेल.

कारण आता ज्या प्रकारे सायबर गुन्हे घडत आहेत, त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेचे सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कसारख्या समस्यांना तोंड देण्याचे आव्हानही रिझर्व्ह बँकेसमोर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

UPSC Success Marathi : अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मार्गदर्शनामुळे कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या ऋषिकेशने UPSC मध्ये ६१ वी रँक

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

SCROLL FOR NEXT