RBI Monetary Policy Updates:  Sakal
Personal Finance

RBI MPC: कर्जाचा EMI कमी झाली की वाढला? रिझर्व्ह बँकेने केली मोठी घोषणा

RBI Monetary Policy Updates: रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 5 जूनपासून सुरू झाली. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज 7 जून रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 5 जूनपासून सुरू झाली. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज 7 जून रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. सलग आठव्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

RBI च्या चलनविषयक धोरण समितीची दर दोन महिन्यांनी बैठक होते. आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

एमपीसीचे सदस्य कोण आहेत?

RBI च्या MPC मध्ये सहा सदस्य आहेत. त्यात बाह्य आणि आरबीआयचे असे दोन्ही अधिकारी आहेत. गव्हर्नर दास यांच्यासोबत, आरबीआयचे अधिकारी राजीव रंजन हे कार्यकारी संचालक आणि मायकेल देबब्रत पात्रा हे डेप्युटी गव्हर्नर आहेत. शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा हे बाह्य सदस्य आहेत.

मध्यवर्ती बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करून 6.5 टक्के केली होती आणि तेव्हापासून सलग 8 वेळा रेपो दरातील स्थिती कायम ठेवली आहे. बँकांचा ईएमआय रेपो दराशी जोडलेला असतो. अशा परिस्थितीत, रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने, सध्या तुमच्या बँक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट हा व्याज दर आहे ज्यावर भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व्यावसायिक बँकांना कर्ज देते. सध्याचा रेपो दर 6.5 टक्के आहे.

रेपो रेट का बदलतो?

चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते आणि कपात करते. ही चलनवाढ रोखण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत राहतात किंवा कमी करत असतात.

रेपो रेट वाढल्याने कर्ज कसे महाग होते?

रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते आणि बँका हा पैसा लोकांना कर्ज म्हणून देतात. या कारणास्तव, जेव्हा जेव्हा रेपो दरात बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम कर्जाच्या EMI वर होतो. म्हणजे रेपो रेट वाढला तर कर्जाचा ईएमआयही वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT