RBI MPC Meeting Sakal
Personal Finance

RBI MPC Meeting: रेपो रेटवर RBIने घेतला मोठा निर्णय, गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

RBI MPC Meeting Updates: गव्हर्नर शक्तीकांत दास 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

राहुल शेळके

RBI MPC Meeting Updates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, एमपीसीने रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी झाली.

रेपो दरात सलग तिसऱ्यांदा कोणताही बदल नाही

यापूर्वी जूनमध्ये झालेल्या बैठकीत सलग दुसऱ्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतला होता. मध्यवर्ती बँकेने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती.

जीडीपी वाढीबाबत आरबीआयचा अंदाज

आरबीआयचा अंदाज आहे की चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के असू शकतो. मध्यवर्ती बँकेने पहिल्या तिमाहीत 8 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के जीडीपी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

किरकोळ चलनवाढीचा केंद्रीय बँकेचा अंदाज

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जुलै ते ऑगस्ट दरम्यान भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. महागाई दर 4 टक्क्यांवर मर्यादित ठेवण्याचा निर्धार केला आहे.

चालू आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर 5.4 टक्के असू शकतो, असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 6.2 टक्के, तिसर्‍या तिमाहीत 5.7 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहील, असा RBIचा अंदाज आहे.

भारत जागतिक विकासाचे नवे ग्रोथ इंजिन

आपल्या धोरणात्मक भाषणाच्या सुरुवातीला, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था चांगली गतीने वाढत आहे हे पाहून आनंद होतो.

ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम मूलभूत तत्त्वांनी देशातील शाश्वत विकासाचा पाया घातला आहे. ते म्हणाले की, भारत जगाच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन बनू शकतो.

गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • आरबीआयने व्याजदर 6.5% वर कायम ठेवला

  • महागाईचा अंदाज 5.2% वरून 6.2% वर वाढवला

  • रोकड कमी करण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल

  • बँकांना NDTL मध्ये 10% ICRR राखणे आवश्यक आहे

  • FY24 GDP वाढीचा अंदाज 6.5%, FY25 GDP 6.6% वर कायम

  • एमपीसीने एकमताने दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मत दिले

  • परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी

  • महागाईचा दर जुलै-ऑगस्टमध्येही वाढणार आहे

  • FY24 CPI चलनवाढीचा अंदाज 5.4%

  • भारत जगाच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन बनू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT