RBI Shaktikanta Das Sakal
Personal Finance

RBI MPC Meet: पावसाळा आला आता तरी महागाई कमी होणार का? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणतात...

एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 4.70 टक्के होता. तर मार्च महिन्यात हाच दर 5.6 टक्के होता.

सकाळ डिजिटल टीम

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी चालू आर्थिक वर्षात महागाईचा अंदाज कमी केला. रिझर्व्ह बँकेने एक गोष्ट स्पष्ट केली की संपूर्ण आर्थिक वर्षात महागाई 4 टक्क्यां पेक्षा जास्त राहू शकते.

पहिली तिमाही वगळता उर्वरित तीन तिमाहीत महागाई 5 टक्क्यांच्या वर राहण्याची अपेक्षा आहे. मान्सूनमधील अस्थिरता, अल निनो आणि जागतिक अर्थव्यवस्था ही त्याची कारण आहे.

आज RBI MPC ने त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयचे लक्ष मान्सून आणि एल निनोवरही असेल. कारण या दोन्ही कारणांमुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

RBI ने चारही तिमाहींसाठी तसेच संपूर्ण आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाजात बदल केला आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, पहिल्या तिमाहीत महागाई 4.6 टक्क्यांवर राहू शकते. त्यानंतर, उर्वरित तीन तिमाहीत महागाईचा दर 5 टक्क्यांहून अधिक असू शकतो.

आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत महागाई वाढीचा दर 5.2 टक्के राहिला आहे. तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के महागाई दर असू शकतो.

एप्रिल महिन्यात मध्यवर्ती बँकेने पहिल्या तिमाहीत 5.1 टक्के, दुसर्‍या तिमाहीत 5.4 टक्के, तिसर्‍या तिमाहीत 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की 2023-2024 मध्ये महागाई मध्यवर्ती बँकेच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त असेल.

RBI गव्हर्नर म्हणाले - धोरण योग्य मार्गावर आहे

एमपीसी बैठकीचा निकाल जाहीर करताना शक्तीकांत दास म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत आम्ही मोठ्या आव्हानांचा सामना केला, परंतु आता धोरण योग्य मार्गावर आहे.

महागाई कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. RBI च्या मते, 2 जून 2023 पर्यंत, देशाचा परकीय चलन साठा 595.1 अब्ज रुपये होता.

RBI गव्हर्नर यांनी मान्सूनबाबत व्यक्त केली चिंता:

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किंमती आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता यामुळे चलनवाढ हा अर्थव्यवस्थेला धोका आहे, असे ते म्हणाले.

मात्र, मान्सून चांगला राहिल्यास महागाई आटोक्यात ठेवण्यास मोठी मजल मारता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. महागाई आणि मान्सूनच्या नियंत्रणामुळे आरबीआय रेपो दर कमी करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT