RBI Repo Rate Sakal
Personal Finance

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक 7 जूनला रेपो दर करणार जाहीर; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

RBI Repo Rate: महागाई वाढीच्या आव्हानांदरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आगामी पतधोरण आढावा बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता नाही. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राहुल शेळके

RBI Repo Rate: महागाई वाढीच्या आव्हानांदरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आगामी पतधोरण आढावा बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता नाही. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 5-7 जून रोजी होणार आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, एमपीसी रेपो दरात कपात होणार नाही कारण आर्थिक विकासाला गती मिळत आहे. फेब्रुवारी 2023 पासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमपीसीच्या बैठकीचा निर्णय 7 जूनला (शुक्रवारी) जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

सलग आठव्यांदा रेपो दर 6.5 टक्के राहू शकतो

7 जून रोजी व्याजदरात कोणताही बदल न झाल्यास रेपो दर कायम ठेवण्याची ही आठवी वेळ असेल. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, आर्थिक परिस्थिती गेल्या धोरणापासून बदलली नाही.

ते म्हणाले की, खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) आणि जीएसटी संकलनाचे आकडे दर्शवतात की वाढ योग्य दिशेने आहे. ते पुढे म्हणाले की, महागाईची चिंता कायम आहे आणि उष्णतेचा विशेषतः भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

महागाई कमी होऊ लागली आहे

इंडस्ट्री बॉडी असोचेमचे अध्यक्ष संजय नायर यांनी देखील आशा व्यक्त केली आहे की, आगामी एमपीसी बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केला जाणार नाही. कारण किरकोळ महागाई दर चार टक्क्यांपेक्षा जास्त आहे. "महागाई कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी, सप्टेंबरमध्ये पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच स्थूल आर्थिक स्थिती स्पष्ट होईल," असे ते म्हणाले.

आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, अलीकडील चलनवाढीचा डेटा आणि खाद्यपदार्थांच्या किमतीच्या डेटानुसार अशीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT