Check Clearance Time  Sakal
Personal Finance

Check Clearance: चेक क्लियरिंगसाठी 2 दिवस वाट बघण्याची गरज नाही: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

Check Clearance Time Reduced: आज, रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीत आपल्या शेवटच्या घोषणेमध्ये, आरबीआय गव्हर्नर यांनी सामान्य लोकांसह व्यापारी वर्गाला एक मोठी भेट दिली आहे. चेक क्लिअर होण्यासाठी आता फक्त काही तास लागतील.

राहुल शेळके

Check Clearence Time Reduced: आज, रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीत आपल्या शेवटच्या घोषणेमध्ये, आरबीआय गव्हर्नर यांनी सामान्य लोकांसह व्यापारी वर्गाला एक मोठी भेट दिली आहे. चेक क्लिअर होण्यासाठी आता फक्त काही तास लागतील. सामान्य लोकांपासून ते व्यापारी वर्ग, बँका, संस्था, शिक्षण आणि आर्थिक जगाशी संबंधित प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी आहे.

आता चेक क्लिअर होण्यासाठी 2 दिवस लागणार नसून काही तासांत चेक क्लिअर होईल. तुमचा चेक त्याच दिवशी क्लिअर केला जाईल आणि यासाठी फक्त काही तास लागतील. यामुळे तुमची बरीच कामे सुलभ होतील.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की चेक देणारे आणि पैसे घेणारे या दोघांना याचा फायदा होणार आहे आणि संपूर्ण प्रक्रियेला गती मिळाल्याने बँकिंगवरही सकारात्मक परिणाम होईल.

महागाईचा अंदाज वाढवला

आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी महागाई दराचा अंदाजही वाढवला आहे. पूर्वी तो 3.8 टक्के असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता महागाई दर 4.4 टक्के करण्यात आला आहे.

इतकेच नाही तर तिसऱ्या तिमाहीत महागाईचा दर 4.6 टक्क्यांवरून 4.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. गव्हर्नर म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई वर्षभरात 4 टक्क्यांच्या वर राहील, जी 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

महागाई फार काळ राहणार नाही

गव्हर्नर म्हणाले की, महागाईचा दबाव हा तात्पुरता असला तरी त्याचा प्रभाव नाकारता येणार नाही. विशेषत: सर्वसामान्यांशी संबंधित वस्तूंच्या किमतींवर लक्ष ठेवावे लागते. किरकोळ महागाई दर कमी झाल्यावरच कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग खुला होईल.

भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जुलैमध्ये शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी आणि मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी महागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court ची रेल्वेच्या 'सेकंड-क्लास पॅसेंजर' शब्दप्रयोगावर नाराजी; अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवर शरद पवारांचा सरकारला इशारा; मुदतीत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar: बाबा, दारू विकू नका; लेकीनं शपथ घालताच बापानं दुकानाला लावलं कुलूप, सुरू केला नवा व्यवसाय

Rohit Sharma Retirement: रोहितच्या निवृत्ती प्रकरणात मोठा ट्विस्ट! अगरकर-गंभीरवर BCCI नाराज? इनसाइड स्टोरी आली समोर,नेमक काय घडल ?

SCROLL FOR NEXT