RBI tightens rules for personal loans, credit cards amid demand surge  Sakal
Personal Finance

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड घेणे होणार अवघड

RBI: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहक कर्जाच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

राहुल शेळके

RBI: आगामी काळात लोकांना क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसाठी (NBFCs) क्रेडिट कर्जाच्या जोखीम वेटेजमध्ये 25% वाढ केली आहे.

याचा अर्थ असा की असुरक्षित कर्ज बुडण्याची भीती लक्षात घेता बँकांना आता पूर्वीपेक्षा 25% अधिक तरतूद करावी लागणार आहे. आत्तापर्यंत बँका आणि NBFC साठी ग्राहक कर्जाची जोखीम 100% होती, ती आता 125% पर्यंत वाढली आहे.

यापूर्वी, ऑक्टोबरच्या पतधोरणात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहक कर्जाच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटले आहे की व्यावसायिक बँकांच्या ग्राहक कर्जाच्या (थकबाकीदार आणि नवीन) जोखमीच्या वाढीमध्ये वैयक्तिक कर्जाचाही समावेश आहे. यात गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यासारख्या इतर सुरक्षित कर्जांचा समावेश नाही.

वैयक्तिक कर्जात 30% वाढ

या वर्षी सप्टेंबरपर्यंत बँकांची एकूण वैयक्तिक कर्जे 48,26,833 कोटी रुपये होती. एका वर्षात ती 30 टक्क्यांनी वाढली आहेत. या कालावधीत सामान्य कर्ज 12-14 टक्क्यांनी वाढली आहेत. अशा स्थितीत कर्ज वाढण्याचा धोका वाढू शकतो. आरबीआयने बँकांना कर्जाच्या मर्यादांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.

वैयक्तिक कर्ज हे अशा प्रकारचे कर्ज आहे ज्याला कोणतीही हमी किंवा सुरक्षा आवश्यक नसते. हे कर्ज बँका किमान कागदपत्रांसह देतात. तुम्ही हे कर्ज कोणत्याही कायदेशीर आर्थिक गरजांसाठी वापरू शकता.

वैयक्तिक कर्जावरील व्याजदर प्रत्येक बँकेसाठी वेगळा असतो. तुम्हाला ज्या व्याजदराने वैयक्तिक कर्ज दिले जाईल ते तुमचा क्रेडिट इतिहास, कार्यकाळ, उत्पन्न, व्यवसाय इत्यादींवर अवलंबून असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT