No need to worry Minister on reports of Centre withdrawing Rs 2000 notes 
Personal Finance

RBI withdraws Rs 2,000 notes: बँकेत नोटा जमा करताय? खबरदार! 'सीए'नी दिला इशारा

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा खात्यात भरण्यासाठी रिझर्व बँकेने परवानगी दिली असली तरी रोख रकमेचे कोणतेही मोठे व्यवहार, आयकर खात्याच्या छाननीखाली येऊ शकतात, असा इशारा सनदी लेखापाल (सीए) चिराग राऊत यांनी दिला आहे.

बँकांनी या नोटा मंगळवारपासून बदलून द्याव्यात असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. मात्र या नोटा कशाप्रकारे बदलून देणार याचे परिपत्रक अद्याप आले नाही. ते एक-दोन दिवसात आल्यावर पहावे लागेल, त्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असेही राऊत म्हणाले.

नोटा बदलून मिळणार असल्या तरी त्या कोणत्या बँकेत बदलून मिळणार, ज्या बँकेत आपले खाते आहे तेथेच त्या बदलून मिळणार का सर्वत्र बदलून मिळणार, तसेच नोटा बदलताना बँका ग्राहकांचे केवायसी मागणार का, पॅन क्रमांक मागणार का, हे देखील पाहायला हवे. नंतर नोटा बदलण्याची संख्येची मर्यादा वाढवली जाते का, हे देखील पाहायला हवे, असेही ते म्हणाले.

मोठ्या रकमेच्या नोटा खात्यात भरताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण सध्या देखील दोन लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम एकाच दिवशी बँकेत भरल्यास त्याची माहिती आयकर खात्याला कळवली जाते. त्यामुळे असे मोठे व्यवहार आयकर खात्याच्या नजरेत येऊ शकतील. छोट्या रकमा बँकेत भरल्यास कदाचित कोणी विचारणार नाही. मात्र मोठ्या रकमेबाबत काळजी घ्यावी लागेल, कदाचित पुढील वर्षी आयकर रिटर्न भरताना आपण दोन हजारांच्या नोटांमार्फत किती रक्कम बँकेत भरली, हा रकाना त्यात असेल अशी शक्यताही राउत त्यांनी वर्तवली.

रिझर्व्ह बँकेने नेमकी काय घोषणा केली?

दोन हजार रुपयांच्या बहुचर्चित नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय रिझर्व बँकेने शुक्रवारी संध्याकाळी घेतला. नागरिकांनी त्यांच्याकडील दोन हजारच्या नोटा तीस सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा कराव्यात किंवा अन्य चलनात बदलून घ्याव्यात असे रिझर्व बँकेने सांगितले आहे. ३० सप्टेंबर पर्यंत या नोटा वैध चलन म्हणून (लीगल टेंडर) कायम राहतील असे बँकेने जाहीर केलंय. तोपर्यंत नागरिक कोणत्याही मर्यादेशिवाय (कायदेशीर व अन्य व्यावहारिक नियम पाळूनच) या नोटा बँकांमधील आपल्या खात्यात भरू शकतील, असेही रिझर्व बँकेने जाहीर केले आहे.

नोटा बदलीची प्रक्रिया कधीपासून?

बँकांनी २३ मे पासून म्हणजेच मंगळवारपासून या नोटा बदलून द्याव्यात असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. बँकांचे इतर कामकाज विस्कळीत होऊ नये यासाठी सध्या केवळ २० हजार रुपये मूल्याच्या दोन हजारच्या नोटा ( फक्त दहा नोटा ) बँकांमधून २३ मे पासून बदलून मिळतील, असेही रिझर्व बँकेने जाहीर केले आहे. बँकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणू नयेत असेही आदेश बँकेने दिले आहे.

दोन हजारची गोष्ट

चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी साधारण ९० टक्के नोटा या मार्च २०१७ पूर्वीच छापल्या होत्या. मार्च २०१८ मध्ये या नोटांची छपाई बंद झाली तेव्हा चलनातील या नोटांचे एकूण मूल्य ६.७३ लाख कोटी रुपये होते. तर मार्च २०२३ मध्ये ते मूल्य ३.६२ लाख कोटी रुपयांपर्यंत आले होते.

पुन्हा घबराट शक्य

सरकार व रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर बँक कामगार संघटनांचे नेते देवीदास तुळजापूरकर यांनी टीका केली आहे. २०१६ मध्ये या नोटा चलनात आणणे व २०२३ मध्ये त्या रद्द करणे ही धरसोडीची कृती आहे. खरे पाहता मुळात या नोटा चलनात आणण्याचा निर्णयच चुकीचा होता, हे आतातरी खुल्या दिलाने सरकारने मान्य करावे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार हा निर्णय रिझर्व्ह बँकेचाच असल्याचे जाणवते आहे. मात्र आता चलनात पाचशे व शंभर रुपयांच्या नोटा पुरेशा नसतील तर व्यवहार करताना अडचणी निर्माण होतील. या निर्णयामुळे लोकांमध्ये घबराट उडण्याचीही शक्यता आहे, असेही तुळजापूरकर यांनी बोलून दाखवले. आता यापुढे लोक घाबरलेल्या अवस्थेतच आपल्याकडी मोठ्या नोटांना हाताळतील. उद्या मोठ्या नोटांचे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, अशा भीतीग्रस्त अवस्थेत लोक राहतील, असेही ते म्हणाले.

काळ्याचा पांढरा होईल ?

दोन हजारच्या नोटांचा साठा असलेले गर्भश्रीमंत लोक पुन्हा या नोटा रिचवण्यासाठी जनधन खात्यांचा वापर करतील का हे आता पहायला हवे. पहिल्या नोटबंदीच्या वेळीही असेच झाले होते, अशीही भीती तुळजापूरकर यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विख्यात नोटबंदी नंतर म्हणजेच नोव्हेंबर २०१६ नंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यावर या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. मात्र त्यामुळे काळा पैसा चलनातून नाहीसा करण्याची कल्पनाच निरर्थक ठरली असे बोलले जात होते. त्यामुळे या नोटा चलनातून बाद होतील अशीही शक्यता तेव्हापासूनच वर्तवली जात होती. मात्र काळा पैसा ओळखू यावा यासाठी या नोटांमध्ये चीप लावल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT