Record number of over 7.85 crore Income Tax Returns filed till October 31 this year  Esakal
Personal Finance

ITR Filing: आयटीआर फाइलिंगचा नवा विक्रम, 31 ऑक्टोबरपर्यंत भरले 7.85 कोटी रिटर्न

ITR Filing: या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये विक्रमी संख्येने प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्यात आले.

राहुल शेळके

ITR Filing: आयकर विभागाने बुधवारी सांगितले की 2023-24 साठी 31 ऑक्टोबरपर्यंत विक्रमी 7.85 कोटी आयकर रिटर्न (ITR) भरले आहेत. आयकर विभागाने म्हटले आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रांची एकूण संख्या 7.85 कोटी आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ( CBDT) निवेदनात म्हटले आहे. 2022 पर्यंत दाखल केलेल्या 6.85 कोटी ITR पेक्षा हे 11.7 टक्के जास्त आहेत.

आयटीआर पडताळणी आणि प्रक्रियेच्या बाबतीतही आयकर विभागाने बरीच प्रगती केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत दाखल केलेल्या एकूण रिटर्नपैकी 7.51 कोटी रिटर्नची पडताळणी झाली आहे.

फॉर्म 10B, 10BB आणि फॉर्म 3CEB सारखे फॉर्म भरण्याची 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. यावर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत असे 1.44 कोटीहून अधिक फॉर्म भरले गेले. रिटर्न आणि इतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेदरम्यानही प्राप्तिकर विभागाच्या ई-पोर्टलवर कोणतीही तांत्रिक समस्या आढळून आली नाही, असेही आयकर विभागाचे म्हणणे आहे.

आयकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'करदात्यांना इनबाउंड कॉल्स, आउटबाउंड कॉल्स, लाइव्ह चॅट, वेबेक्स आणि को-ब्राउझिंगद्वारे ITR भरण्यास लोकांना मदत झाली.

हेल्पडेस्क टीमने कर विभागाच्या ट्विटर हँडलवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही प्राप्तिकर विभागाने दिली. ई-फायलिंग पोर्टलवर कर संबंधित माहिती देणारे व्हिडिओही अपलोड करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम ITR च्या संख्येतील वाढीवर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT