Drug Rate Revised by NPPA Sakal
Personal Finance

Medicine Rate: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इन्फेक्शन, कोलेस्ट्रॉल, शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार

Drug Rate Revised by NPPA: देशात वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे.

राहुल शेळके

Drug Rate Revised by NPPA: देशात वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. (Regulator NPPA fixes rates of 100 drugs; diabetes, cholesterol, fever, infection drugs on the list)

यानंतर कोलेस्टेरॉल, साखर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील आणि लोकांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल.

सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर सुधारित दर असेल. त्याच वेळी, डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागेल. देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

त्यामुळे सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किंमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

'या' आदेशाची अंमलबजावणी कशी होणार?

नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहिला जाईल. डीलर नेटवर्क नवीन किमतींबद्दल माहिती देतील. कंपन्यांनी त्यासाठी पैसे भरले असतील तरच ते निश्चित किंमतीवर जीएसटी वसूल करू शकतील.

NPPAचे काम काय आहे?

NPPA ची स्थापना 1997 मध्ये झाली. ही संस्था फार्मा उत्पादनांच्या किंमती ठरवते. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवते आणि औषधांच्या किंमतींवर लक्ष ठेवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT