Reliance, Disney sign non-binding agreement for mega deal Report
Reliance, Disney sign non-binding agreement for mega deal Report  Sakal
Personal Finance

Reliance Disney: डिस्नेसोबत अंबानींचा करार! रिलायन्स बनणार मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी

राहुल शेळके

Reliance Disney Deal: उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मनोरंजन विश्वातील सर्वात मोठी डील केली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी बनेल. रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने यांच्यात करार झाला आहे.

या अंतर्गत वॉल्ट डिस्नेच्या भारतीय व्यवसायातील 51 टक्के हिस्सा रिलायन्सच्या मालकीचा असेल. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर देशातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी मुकेश अंबानींकडे असणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात लंडनमध्ये वॉल्ट डिस्ने कंपनी सोबत नॉन-बाइंडिंग टर्म करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारावर बराच काळ चर्चा सुरू होती. मुकेश अंबानी यांची कंपनी भारतीय मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेत आपला दबदबा वाढवण्यासाठी अमेरिकन कंपनी वॉल्ट डिस्ने कॉर्पोरेशनशी चर्चा करत आहे.

इकनॉमिक टाइम्सच्या अहवालात मुकेश अंबानींच्या कंपनीने लंडनमध्ये हा मोठा करार केल्याचे सांगितले आहे. त्यात म्हटले आहे विलीनीकरण फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम केले जाण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, जानेवारी 2023 पासून डिस्ने आपला भारतीय व्यवसाय विकण्याचा किंवा भारतीय कंपनीला संयुक्त उपक्रमासाठी भागीदार बनवण्याचा प्रयत्न करत होती. डिस्नेकडे अनेक टीव्ही चॅनेल आणि हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म देखील आहेत. विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्या मिळून 1 ते 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकतात.

गेल्या आठवड्यात बीएसईवर टॉप-10 कंपन्यांपैकी तीन कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे. यापैकी रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला आणि रिलायन्सचे मार्केट कॅप 47,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढून 17.35 लाख कोटी रुपये झाले.

रिलायन्सच्या शेअर्स गेल्या शुक्रवारी थोड्या घसरणीसह 2,561 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. आता मंगळवारी रिलायन्स-डिस्ने डीलचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Narendra Modi: जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर कंगनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते..."

Akola News : उद्योजकांची पिळवणूक थांबवावी;एमआयडीसी प्लॉट ओनर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Whatsapp Ban : या सहा देशांनी घातलीये व्हॉट्सॲपवर बंदी; चुकून वापरलं तर थेट जेल,जाणून घ्या का आहे अशी जबरदस्ती

SCROLL FOR NEXT