Reliance Industries in talks to buy Tata Play stake from Disney Sakal
Personal Finance

Reliance: अंबानी टाटा प्लेमधील हिस्सा खरेदी करणार? नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनला देणार टक्कर

Reliance Industries in talks to buy Tata Play stake from Disney: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) वॉल्ट डिस्नेकडून टाटा प्लेमधील 29.8 टक्के हिस्सा घेण्याच्या विचारात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे पाऊल भारतातील टेलिव्हिजन वितरण क्षेत्रातील धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

राहुल शेळके

Reliance Industries: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) वॉल्ट डिस्नेकडून टाटा प्लेमधील 29.8 टक्के हिस्सा विकत घेण्याच्या विचारात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे पाऊल भारतातील टेलिव्हिजन वितरण क्षेत्रातील धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची सॅटेलाइट टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर टाटा प्लेमध्ये 50.2 टक्के आणि वॉल्ट डिस्नेची 29.8 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित भागभांडवल सिंगापूर फंड टेमासेककडे आहे.

टाटा प्लेवरील चर्चा यशस्वी झाल्यास, टाटा समूह आणि अंबानी पहिल्यांदाच एका उपक्रमात संयुक्त भागीदार होतील आणि टाटा प्ले प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा विस्तार केला जाईल. असे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.

डिस्नेने टाटा प्लेच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरच्या वेळी कंपनीतून बाहेर पडण्याची योजना आखली होती परंतु या डीलला उशीर झाला आहे आणि अमेरिकन कंपनी आपल्या गुंतवणूकीतून बाहेर पडण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. याबाबत रिलायन्स, डिस्ने आणि टाटा सन्सच्या प्रवक्त्यांनी याबात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

टेमासेकने गेल्या वर्षी टाटा समुहाशी कंपनीतील 20 टक्के भागभांडवल 1 अब्ज डॉलर मूल्यावर विकण्यासाठी देखील चर्चा केली होती. पण पुढे ही डील झाली नाही. टाटा प्लेमधील स्टेक खरेदी करून, रिलायन्स आपल्या जिओ सिनेमाचा संपूर्ण कंटेंट टाटा प्लेच्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकते.

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, जिओ सिनेमा आणि ॲमेझॉन प्राइम यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील स्पर्धेमुळे टाटा कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा प्लेला 105 कोटी रुपयांचा तोटा झाला आणि त्यांचे उत्पन्न 4,499 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 4,741 कोटी रुपये होते आणि कंपनीने 68.60 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

वॉल स्ट्रीट जर्नलने अलीकडेच वृत्त दिले होते की वॉल्ट डिस्नेने भारतातील टीव्ही आणि OTT व्यवसायातील 60 टक्के हिस्सा रिलायन्सला 3.9 अब्ज डॉलरला विकण्याचा प्राथमिक करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT