Rent received from redevelopment building is not taxable finance esakal
Personal Finance

Mumbai News : पुनर्विकास इमारतीतून मिळणारे भाडे करपात्र नाही; न्यायाधिकरणाचा निकाल

सनदी लेखापालांनी दाखवला बारकावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुनर्विकास होत असलेल्या इमारतीतील घरमालकांना बिल्डरने दरमहा दिलेले भाडे हे आयकराच्या कक्षेत येत नाही असा निकाल आयकर अपिली न्यायाधिकरणाने नुकताच दिला आहे. मात्र यातील एक बारकावा तज्ञ सीए दाखवून देत आहेत.

विशेष म्हणजे घरमालकाने हे भाडे घेऊन ते खर्च केले नाही व तो आपल्या सर्विस क्वार्टर्समध्ये किंवा आई-वडिलांच्या घरात राहिला तरीही त्याला त्याच्यावर आयकर द्यायची गरज नाही असे अजय कोठारी यांच्या प्रकरणाच्या निकालात म्हटले आहे.

मात्र सनदी लेखापाल चिराग राऊत यांनी या प्रकरणातील एक बारकावा दाखवून दिला आहे. त्यानुसार ज्या रहिवाशांना बिल्डरकडून भाडे मिळते व ते रहिवासी भाड्याच्या घरात राहत असताना त्याचे घरभाडे देण्यावर ती रक्कम खर्च करतात त्यांना आयकर भरावा लागणार नाही.

मात्र जे रहिवासी बिल्डरकडून मिळणारी भाड्याची रक्कम घरभाड्यावर खर्च करत नाहीत, त्यांना ती रक्कम केव्हातरी आयकर खात्याला दाखवावीच लागेल, असे राउत यांनी दाखवून दिले. अशा रहिवाशांनी अशी खर्च न केलेली भाड्याची रक्कम त्याचवर्षी इनकम फ्रॉम अदर सोर्सेस या सदराखाली आयकर खात्याला दाखवावी.

अन्यथा भविष्यात पुनर्विकासातील नवीन घर विकताना ती रक्कम त्यांच्या घराच्या खरेदीच्या किमतीतून वजा होईल. त्यामुळे त्यांना त्या घराच्या विक्रीतून जास्त भांडवली लाभ दाखवावा लागेल व त्यावर जास्त कर भरावा लागेल असे राऊत यांनी दाखवून दिले.

त्यामुळे बिल्डरकडून घरभाडे घेणाऱ्यांनी ती रक्कम खर्च न केल्यास ती रक्कम आताच आयकर खात्याला दाखवावी लागणार नाही. पण केव्हातरी ती रक्कम आयकर खात्याला दाखवावीच लागेल, केव्हा दाखवावी तो निर्णय त्यांनी घ्यावा.

वरिष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे ज्यावर्षी असे घरभाडे मिळते ते खर्च होत नसल्यास त्याचवर्षी ते आयकर खात्याला दाखवावे असाही सल्ला राउत यांनी दिला. ही परिस्थिती पूर्वीपासूनची असून प्राधिकरणाच्या निकालाचा हाच अर्थ असल्याचेही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT